॥1॥७॥॥1 8॥९॥-॥४१(- 8९0)()९

1८.70 1 ४४॥॥॥-॥॥१ 1-८ 3९90000 (“५-४

८80006४४७5 _) २८॥१९/-८६०

()॥५॥४/८॥२5७/१|_ (13२,

0 194618

१२०) 7१०० हि. ॥४७-4/॥५]

नागपूर प्रकाशन क्र.---२६

संगीत पहिला कवि

लेखक --

सी. म. बापट साहित्य विशारद

प्रस्तावनाकार.-

प्राव्याक, वि. मा. दी. पटवधेन कर्नाटक कॉलेज, धारवाड

१९५०] > नागपर [ किंमत १॥ रुपये प्रकारान

प्रकाशक--

दि. मा. घुमा गर नागपूर प्रकाशन, सीताबर्डी बतागपूर,

पहिली आवृत्ति--आगस्ट १९५० सवे हकक लेखकाधीन

मुद्रक--

ल. म. पटले, रामेश्‍वर प्रिटिंग प्रेस, सीताबर्डी, नागपूर,

तिसरी घटा ०१५३६०

ळटारू म्हणून जगगारा वाल्या कोळी कांही युक्तिवादामुळें एकाएकीं हृदय- पालट होऊन कवि बनला, ही पुराणांतरींची घटना मला लहानपणीं नेहमींच अद्भुत वाटे. बरें, नारद नांवाच्या त्या भटक्या भगवद्‌ भक्ताचा युक्तिवाद तरी असा काय मोठा बिनतोड होता वाटे कों, आम्हांला एकादा चोर लबा- डायला आला असतां तर आम्ही नसती कां अशी अक्कलहुशारी लढविली

पग लवकरच कळून चकलं कीं, हल्लींचे डाकूही निराळे आणि त्यांच्या पापपुण्याच्या कल्पना निराळ्या. नारदाच्या वेदांताला आजचा डाकू भीक घाळीळ हा सुतराम्‌ संभव नाही. तरी पग या नाट्यपूण घटनेवर एकादी नाटिका लिहितां येईल ही माझी कल्पना कायम होतीच, आणि म्हणून माझे मित्र श्री. खी. म. बोपट यांच्या प्रमावी लेखगींतून ती “पहिला कवि" या नांवानें कागदावर उतरलेली पाहतांच मला फार आनंद झाला.

कवि हा प्रागी सहसा गभेश्रीरमंतींत जन्मास येत नसून दारिद्रयाच्या चळचणीलळाच तो आढळायचा. दुःखानं होरपळलेला आणि परिस्थितीनं गांज- ठेला त्याचा जीव परपीडेविषयीं अधिक हळवा बनतो, आणि आपल्य काव्य स्फुल्लिंगानं तो चहुकडे मानवतेची मशाल पेटवितो. श्रीर'मावताराची कथा लिहिण्याचं काम एकाद्या लब्धप्रतिष्टित साहित्यिकाएवजीं अनुभवानं पावन झालेल्या अश्या एकाद्या कवीनं करावं, हा परमेश्‍वरी संकेत वाल्मिकीच्या कथेत श्री. बापटांनीं चांगल्या तऱ्हेनं सूचित केला आहे.

द्रष्टेपणा हा जो अभिजात कवीचा जन्म स्वभाव तोहि वाल्मिकीच्या कथेत स्पष्ट दिसून येतो. प्रत्यक्ष अवतार होण्यापूर्वीच प्रभ रामचंद्राच्या लीला

पाहला कवि

क्क्ऱ

केवळ कल्पनाशक्तीनं रंगविणं, कार्य प्रतिभासंपन्न कवीदिवाय दुसर्‍या कोणाला साधणार ज्या वेळीं जगाला अटम बॉंबची कल्पनाही नव्हती, त्यावेळीं शिलर ? कवीनं आपल्या एका कवितेत प्रियाराधन करणाऱ्या एका प्रगयी वीराच्या तोंडीं पुढील शब्द घातले आहेत--“ हे प्रिये, तुझ्याकरितां मी काय बरें करणार नाही मोठमोठया शास्त्रज्ञांनी देखील अभद्य ठरविलेला अटम्‌ ( अणु ) मी फोडीन आणि त्यांतून निर्माण होणाऱ्या शक्‍तीनं हें सारं जग अंतराळांत उडवून देईन ! भावी समाजक्रांतीचे दशन आपल्या काव्यांतून घडविगारा कवी हा युगप्रवतक ठरतो. अर्थात्‌ वाल्मिकी ह' अशा कवींचा मूळ पुरुषच म्हटला पाहिज.

जन देख रवि, तें देख कवि, या म्हणीचा विपयीस करून पृष्कळ वेळां कवीची कुचप्टा केली जाते. कडी लावलेल्या दाराच्या फटीमधून जे पाहूं नये तें पाहणारा एक चावट प्राणी, येथपयत कतरीची कुचेष्टा होते. पण वरील म्हणींचा खरा आशय कोगता हें विशद करणारं एकच उदाहरण येथें देतो. प्रत्यक्ष रामायण घडलं आणि सीताहरण झालें, तेव्हां जे रामप्रभु खंबीरपगानं आपल्या शत्रूशी सामना दत होते, तेच सीतादेवीसह अयो"्येस परत आल्यावर राज्याभिषकोत्सवाच्य, प्रसंगीं सीताहरणाचं नाटक पहात असतांना ढळढळा रडल. तोच प्रसंग आणि तींच पात्रें. पण त्यांवर कवीच्या प्रतिभचे संस्कार झाल कीं, त्यांना एक निराळाच रंग चढतो आणि तीं अधिक भावनारूप बनतात. वाल्याचा वाल्मिकी झाला, हा साधा प्रसंग श्री, बापटांच्या कवित्व- शक्‍तीनं असाच रंगविल्या कारणानं तो प्रेक्षकाचं हृदय हलवून सोडण्या इतका परिणामकारक झाला आहे.

या नाटिकेंत नाटययुगांपेक्षांही वाडमचगुण अधिक प्रकषानं आढळतात.

1 जगांत कवीची भूमिका कोणती, तें विशद करण्याचं कार्ये लेखकानं फार कौशल्यानं केलं आहे. काव्य कां लिहदायच याचं उत्तर जर, -- माण- सांच्या अतःकरगांतल्या मूदु भावना जागृत करून त्यांच्या तील पशुत्व कमी व्हावं म्हयून”-अरसं असेल तर महाकवि वात्मिकीनं रामायण निमोण करून तें साथे

तिसरी घंटा ष्र

करून दाखविले आहे. रामचरित्राची कथा म्हणजे अनेक रोमहषग प्रसंगांची एकत्र गुंफग आगि त्यांतला प्रत्येक प्रसंग जीवनाचीं नवीं मूल्यं तयार करणारा. अशा महाकाव्याच्या निमात्याचं मनोविकसन प्रस्तुत नाटयकथेंत चांगल्या तऱ्हेनं रंगबिलेलं दितून येत. ही एक तपरचया आहे, आगि ती झाल्य़ाविना प्रतिभा- संपन्न माणसाचं द्रष्ट्या कतींत रूपांतर होत नाही. अग्नींत तावून सुलाखून निघाल्याशिवाय सोन्याचा कस कसा चढेल

लेखकाचं भाषाप्रभत्व असामान्य नसलं तरी तं मोहक खास आहे. संत्राद कंटाळवांगे होतां उलट रसोत्कर्षांस साहाय्य करतात. सुंदर आगि नाविन्यपूगे कल्पना संभाषणाच्या ओघांत पेरून देण्याचं बापटांचे कोशल्य कौतुकास्पद आहे. या दृष्टीनं नाटकाचा दुसरा अक्र फारच छान साधला आहे.---““ मासळीची चाहूल लागतांच बगळ्य़ाची समाधी खाडकन उतरते ?- फुलांच्या पाकळ्य़ांत लतेला तिचीं गोड स्वप्ने दिसत असतात. ”--“' मधूर स्मृतींच्या अमृतानं संसारांतल्या निराशेचे विष प्रेमी जीव पचवून टाकतो. ”--- इत्यादि रम्य कल्पनांचे तुषार या नाटयोद्यानांत विहरणाऱ्या वाचकाचा शीण नाहीसा करतात. साध्या सुबोध पण प्रासादिक रसवेतीची मोहक हिरवळही जागोजागीं दृष्टीस पडते.

सुख वाऱून ध्यायला सारे घावून येतात पग दुःखाला वाटेकरी कोणीच असत नाही. ”---“ प्रेमाच्या पाणपोइवर तिऱ्हाइताच्या हातानं पाणी पिऊन तहान भागत नाही, ?--“ पायांतल्या दगडांची कहाणी सूयकिरणांत झळक- णाऱ्या सुवण कळसाला ऐकूं येत नाही. ?”---“' पाण्यापासून लार बाजूला करतां येइल काय इत्यादि सुभाषित या नाटिकेंत विपुल आहेत. विनोद सूक्ष्म असून तो रसहानी कोठेंच करीत नाही.--“ पुढे मागं होणाऱया आणि होगाऱ्या अवतारी कथा अगदी अवतार आल्या प्रमाणं लिहून काढतील म्हगजे अवतार धण्याची गरज देखील भगवंतांना पडायची नाही. असा शाब्दावरचा कोटिकम क्वचित्‌ असला तरी तो देखील मोठा रुचिर वाटतो.

द्‌ पाहिला कावि

नाटकाचं अखेरीस वाल्याची सत्वपरीक्षा * रंभे ) कडून करविली नसती तरी चाललें असतें, अशी माझी समजूत आहे. ही सत्वपरीक्षा पाहण्याची खोड कांहीं देवांना आणि क्रषीवयोना होती हें खरें घरं तरी, नाटकाच्या कथा- नकाल! किंवा वाल्मिकीच्या स्वभावपरिपोषाला तिचा फारसा उपयोग होत नाही. फार तर एवढेंच म्हणतां येईल कीं वाल्मिकीच्या मनाची पातळी किती उंचावली होती, ते या प्रसेगावरून नाटककारास दाखवायचं होत.

ज्या एकरा घटनेमुळे वाल्याचे मनश्‍चक्षू उघडतात, ती नाटकांतली मध्य- वती घटना चटकदार तऱ्हेनं रंगविली गेळी आहे. पण तिला पूरक अश्या घटन; कथानकांत फारशा नसल्यामुळे कथासूत्र साहजिकच जरा तोकडे वाटतें. ही उगीव लेखकानं आपलं संवादलेखनाचं कोशल्य पणास लावून बरीच भरून क!ःढली आहे.

नाटकांतल्याभ्षह्षिक्ष्ष पदांत मूतिमंत काव्य भरलेल दिसतें. रचना प्रसाद- पून पग सुटसुटीत, चाली सोप्या पण नादमधुर, आणि शब्दयोजना सहजसुंदर पग अथंपूर्ग, असं या नाटकाच्या पद्यविभागाचे थोडक्यांत वणन करतां येइल. श्री. बापट हे मराठींतळ एक नामवत कवि असून फुलांच अश्रू हा त्यांचा पहिला काव्यगुच्छ रसिकांकडून नांवाजला गलला आहे. तेव्हां एका कवीनं दुसऱ्या एका महाकवीची जन्मकथा लिहावयास घतल्यासुळे लेखक आणि कथानायक यांचा या ठिकाणीं झालला ' समसमां संयोग? फार हृदयेगम वाटतो.

माझ्या मित्राचं हे पहिळच नाटक आहे. रंगभूमीवर त्याचे कांही प्रयोग झालं असल तरी रंगभूमीच्या दरबारांत दबकत दबकत पाऊल टाकण्यापक्षां जास्त सराईतपगा माझ्या मित्राजवळ नाही. वाचकांना ही त्याची कलाकृति सादर करतांना मी इतकेच म्हणेन कौ, नाटक अत्यंत कळकळीनं आगि भाव- मधर वाणीनं लिहिले आहे, आगि लेखकाच्या भावी कलानेपुण्याची वानगी म्हणून आपल्यापुढे ठेवण्याइतकं तें खचित सुरस आहे.

“आपक!' बंगळा वर

आपटे रोड, पुगे ४, 9१म १९५० |

संगीत

पाहिला कवि

या नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापूरच्या 'नाटय कलामंदीर' तेथीळ पॅठेस थिएटरांत ता. ३-९-१९४५ रोजीं रात्रौ १० वाजतां केला.

वाल्या कोळी

नारद्‌ द्र

भूमिका

भीमराव काळे मास्टर कृष्णराव अबपकरबी. ण. श्रीनिवास जोशी भागवत निमकर कुमार मुरलीधर सो. वत्सला पाटील

शांता कुमारी

गायकवाड

के. काटवे गुरुजींच्या पुण्यस्मतीला हे पुष्प समपेण केले आहे--

एक होता लरटारू

गवव कमळ

तो चोरांचा पुढारी--ठटारूंचा राजा होता. वाऱ्सरांच्या माना छाटतांना त्याच्या मनाला कांहीच वाटत नसे. एक वेळ फत्तरालाहि पाझर फुटला असता ! ःय़राचा तो एक नित्याचा खेळच होता. त्याच्या मुखावर वाघाची उग्रता, नजरेत कृष्गसपांची क्रूरता आणि बाहूंत वज्राचा कठिणपणा सामावला होता. जणूं काळ- पुरुषाची विक्राळ मूर्तीच !

त्याला जगाची पवा नव्हती. आपला आवडता उद्योग त्यानें अखंड चालुं ठेवला. मारलेल्या माणसाची खूण म्हणजे एक खडा--अश्ा खूनखडयांनीं त्याचे सात रांजग काठोकाठ भरून गेले. बेडर वृत्तीनं पातकांचा गोतावळा आपल्या- भोवती गोळा करीत तो राहिला. हंच रक्‍तलांछित जीवन त्याच्या ललाटी लिहिलें होतें काय ?

परिस्थितीने माणूस बनतो, त्याच प्रमाणे माणूस आपल्या कृतीने परिस्थितों बनवितो. हेंहि तितकेच सत्य अ'हे. असा एकादा विलक्षण क्षण यतो कीं, त्यानें मानवी जीवनाला अगदी वेगळें वळण लागतें. ती एकच घटना-पण तिने वाल्या ' कोळ्याच्या जीवनांत केवढी क्रांती क्रेली ! लाल निखाऱ्याचा अमोल हिरा ठरला, विषाचे अमृत झालें. काय चमत्कार पहा ! असत्याचा पृतळा, सत्याचा वाली झाला. एक निदेय गळेकापू , कळेचा प्रेमळ पूजक बनला-दगडाचा देव झाला !

प्रकाशाला गिळू पाहणारा गडद अंघार स्वतांच प्रकाशमय झाला आणि त्यांतून विशाल विश्‍वमेदिराला दिव्य शोभा देगारी सुंदर काव्यकला उदयाला आली.

एक मोठा ठटारू, महर्षिझाला आणि तोच जगाचा ' पहिला कावे! !

रसी. म. बापट

अंक१ ला प्रवेश पाहिला

( स्थळ--इंद्रसभा, इंद्र सिंहासनावर बसला असून रंभेचं नृत्यगीतः चाळू आहे. ) [१] रंभा-- रुणझुण पेजण वाज चंचल नयना नाचत ललना स्वग खुखाचा साजे घ०

दुंगार रसाची गंगा

उधळित रे दिव्य तरंगा मधुर गीत रमवीत मनाला

नाद जगी तोगाज॥१॥

नवलाचा दिन हा दिसला

रसिकांचा राजा रमला खुंदर पाहला रंग बहरतां

हा नवबाला लाज ॥२॥

( नृत्यगीत आटोपल्यावर अभिवादन करून रंभा बाजूला होते. मंद वीणानाद लांबून एकू येत असल्याचा भास इंद्राला होतो. )

इंद्र--( विस्मयाने ) वीण्याचा हा मंजुळ नाद कुठून येत असावा ! आवाज तर अगदी ओळखीचा वाटतो. नारद मुनि तर इकडं येत नसतील ना!

-१२९ पाहेला कवि

बरेच दिवसांत त्यांची स्वारी या बाजूला वळली नाही. हो, बहुतेक तेच यंत असावेत ! त्यांच्या सारख्या विरक्त पुरुषाला माझा हा दरबारी डामडौल कदाचित्‌ रुचणार नाही. मीच स्वतां त्यांना सामोरा जावं हें उत्तम ! ( सिंहा- सनावरून खाली उतरतो. प्रतिहारी येतो)

८२

प्रतिहारी--( मुजरा करून ) महाराजांचा जयजयकार असो !

इंद्र--( कांहीशा दिमाखानें ) काय वाता आहे

प्रतिहारी--देवर्षि नारद आपल्या भेटीला इकडेच येत आहेत. मी 'त्यांना लांबून ओळखुन महाराजांना वर्दी द्यायला आलां.

इंद्र--त्यांच्याच आगमनाची मी वार पहात आहे. लवकर जा आणि त्यांना आदरानं घेऊन ये.

प्रतिहारी--जशी आज्ञा महाराज ! ( मुजरा करून जातो. नारद भजन करीत प्रवेश करतो. इंद्र त्याला वंदन करतो. )

नारद--( हसत मुखाने ) देवेंद्रा, तुझा विजय असो !

इंद्र--( नम्रपणानें ) आपल्या पावन दशेनानं मी आज धन्य झालों. या सेवकाला आपली काय आज्ञा आहे

नारद--या इंद्रपदापेक्षांहि तुझा हा विनय तुला अधिक शोभून दिसत आहे.

इंद्र --गेले कित्ग्रेक दिवस माझ्या मनाला एक प्रकारची रुखरुख लागून राहिली होती. पण ती काय असावी हें कांही केल्या मला उमगेना. आपल्या पुण्यमय प्रभावानं ती आज दूर झाल्याप्रमाणं मला वाटतंय. पृथ्वीचा संसार कसा काय चालला आहे आपला संचार तिन्ही लोकांत असतो. तेव्हा म्हटलं कांही नवल विंशष--

नारद--( हसत ) कसलं नवल. अन्‌ कसलं विशेष ! पण हं पहा, मानलं तर आहे अन्‌ मानलं तर नाही. तुल काय म्हणा ! बोलून चालून वू

अक? ला १३-

पडलास राजा, आगि त्यांतून विलासी देवमंडळाचा अंधिराजा, ना चिंता ना यातायात ! ' सुखंच मे शयनं मे? असा तुझा कारभार. पृथ्वी बुडाली काय अन्‌ तरली काय, तुला दोन्हीहि सारखंच. तुझप़ा सारख्या भाग्यशाली श्रीमंताची काय नेहमीच दिवाळी. दारिद्याच्या आगींत होरपळून निघणाऱ्या मुक्या जिवाची तडफड, सोतेरी सावलींत चिप्तावलेल्या सुखाजीला कशी कळणार ! मंद वायुलहरीनं सुरकगार्‍्या कोवळ्य। पालवीला खालीं गळून पडलेल्या जुन्या पानांची आपुलकी वाटत नसते. आकंठ अमृत प्यावं अन्‌ सुकुमार रूपवतींच्या सुंदर सहवासांत नवजीवनाचा आनंद ठटावा, सभासमारंभ नी सुखसोहाळे साजरे करावेत --

इंद्र -( अहंकाराने ) रजिप्रगाचा बोज कायम टिकून रहावा, तसाच आपल्या प्रजेचा उत्साह सदेव वाढतां असावा म्हणून अशा गोष्टी करणं आम्हाला अवरऱ्ग्रमेव असत, आणि आमच्या इभ्रतीच्या दप्टीनं त्यांपातून झाला तर फाय- दाच होतो, असा आजवरच आमचा अनुभव आहे.

नारद---( उपहासाने ) तुझा हा उपक्रम स्तुत्य आहे आगि त्याबद्दल तुझं अभिनदन करावंसं मला वाटतं.

इंद्र--माझ्य़ा प्रजेच्या हितासाठी मी नेहमी डोळ्यांत तेल घालून बसलेला असतो.

नारद--तसा स्वभावानं तूं चांगला आहेस.

इंद्र --भूलोकावर अलिकडे आपण कधी गेला होता काय तिथली हाल- हवाल कशी काय आहे

नारद--.उपरोधी स्वराने) पृथ्वीचे दुःख सुखी स्वगाला कसे कळणार !

इंद्र --( आरचयान ).कां कळूं नये

नारद--कळांयला कांही हरकत नाही म्हणा ! पण ते तसं कळले नाही हे मात्र खरं ! कारग तुझ्या या विचारण्यांतच पृथ्वीचा वनवास विलासी

२१४ पाहला कवि

स्वयाला समजला नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. परदुःख ज्ीतल असतं ! |नुसते डोळे अन्‌ कान उघडे ठेऊन भागत नाही. गरीबांच्या यातना ध्यानांत यायला मन जागे असावं लागतं. सभोंवार पसरलेल्या घायाळ जीवांचे पडसाद अजून तुझ्या हृदयाच्या गाभाऱ्यांत उमटेल नाहीत. गरीबीची कळ श्रीमंतीला सहसा कळत नाही, या नियमाला तूं तरी कसा अपवाद असशील ! पाय़ांतल्या दगडांची कहागी सूयेकिरणांत झळकगाऱ्या सुवण कळसाला ऐकूं येत नाही. पग त्याच खालच्या खालीं खचून जागाऱ्या सुक्‍या दगडांच्या रडण्यांत त्य] कळसाचं मरण हसत असतं. पृथ्वीच्या पोटांत भडकळेली आग अगदी उंचावर असणाऱ्या स्वबगोला अद्यापि पो'च्‌ शकली नाही. परंतु ही आग साधी नसून, उभ्या विश्वाला जाळून टाकणार्‍या प्रलय कालाचा हा उसळणारा अंगार आहे. त्यांतून तुझा स्वर्ग सुखरूप राहील असं कां तुला वाटतं

इंद्र--( चपापून ) मुनिवये ! तुम्ही सांगता आहां ही गोष्ट अगदी सत्य आहे कां का माझं मन बघण्यासाठी तुम्ही ही कोलती पेटवून ठेवली आहे. अहो, असा भडाका उडायला एवढ झालंय तरी काय मानव. लोक कसल्या - संकटांत सापडला आहे--या वेळीं माझ्या मदतीचा कांही उपयोग होईल कां

नारद--(हसून) काय असतील नसतील ते प्रश्‍न एकच दमांत विचारून घे. मग मला जमल्यास अन्‌ सुचल्यास त्यांचीं उत्तरं देण्याचा मी सावकाश प्रयत्न करून पाहीन. कारण सध्यां तुला काम नाही अन्‌ मलाहि कुठं थारा नाही,

'इंद्र--( आजवी स्वराने ) तुम्ही मळा असं बुचकळ्यांत पाडूं नका. कसलाहि आडपडदा ठेवतां काय असेल तं अगदीं स्वच्छ सांगून टाका. भूमातेचं दुःख दूर करायळा मी एका पायावर तयार आहे.

नारद--तुझा हा उत्साह आगि पृथ्वीच्या कल्याणाविषयीं तुला वाटणारी कळकळ पाहून माझं अतःकरण आनंदानं कस उचंबळून येतय. खरोखर, पृथ्वीचं भाग्य शोर म्हणून तिला तुझ्यासारखा पराक्रमी पाठिराखा मिळाला 'पग--

अंक ला १५

इंद्र --( अधीरतेनें ) पग काय तुमच्या अशा अधवट बोलण्यानं मी अधिकच गोंधळून जात आहे. कोगत्या असुरानं पृथ्वीतलावर असा कहर मांडलाय ? त्याचं नांव तर मला कळूं द्या, म्हणजे एका क्षगांत त्याला होता कीं नव्हता असा करून टाकतो.

नोरद--बाबा, जरा दमानं घे. नाहीतर, ' उतावळा नवरा अन्‌ गुढ घ्याला बाशिंग ? असा प्रकार व्हायचा. मानवांनी तुम्हां देवांना आहुती द्याव्यात आणि तुम्ही त्य़ा डोळे मिटून ग्रहण कराव्यात, हा तुमचा आजवरचा शिरस्ता. मोठेपणा हवा पग त्याबरोबर त्याला लागगारी जबाबदारी अंगावर ध्यायला नको. हें पृथ्वीचं संकर आतां इतकं वाढलं आहे कीं, तुझ्या पराक्रामाचा तिथे काडी हतकाहि उपयोग होणार नाहीं. आंतल्या आगीनं उतूं जाणाऱ्या पिसाट अन्‌ अफाट सागराला किनाऱ्यावरचा बांध कितीसा अडवून धरील ! रानाला लागलेला वगवा चळकाभर पाण्यानं विझत नसतो. असा*्य रोग बरा करायला असामान्य धन्वंतरीच हवा. तिथे अकाद्या वाटेवरच्या वेदूची मात्रा चालायची नाही.

इंद्र--( शरमून ) ही गोष्ट इतक्या विकोपाला गेली असेल याची मला मुळीच कल्पना नव्हती. हें ऐकून माझी छाती तर दडपून गली आहे. आतां याला तोड काय

नारद--त्याच खरपटींत सध्यां मी गुंतलो आहे. भगवंतांची भेट घेऊन नुकता'्च मी वैकुंठाहून परत चाललो होतो. म्हटलं जातां जातां तुझाहि समा- चार घेऊन जावं म्हणून सहज इकड वळलो इतकेच.

इंद्र--भगवान्‌ काय म्हणाल

नारद-र्‍य़ा अनथोमधून पृथ्वीची सोडवणूक करण्याला आगि दीनदुब- ळ्यांचा विस्कटलेला संसार सावरून धरायला ते लवकरच अवतार घेणार आहेत.

इंद्र--हें शुभ वर्तमान ऐकून मला फार आनंद होत आहे.

श्द्द पाहिला कावे

नारद--भूलोकावर राक्षसांचा पक्ष अत्येत प्रबळ झाला आहे. अधमे आणि अन्याग्र यांनी सार्‍या जीवांची * दे माय घरणी ठाय ? अशी अवस्था करून सोडली आहे. स्वतां प्रगट झाल्याखेरीज जगाची मोडलेली घडी पुन्हां नीट बसगार नाही, असं प्रभूंचे स्पष्ट मत 'डलं. परंतु त्या पूर्वी एक अवघड काम त्यांनीं माझ्यावर सोपविले आहे. त्यामुळे माझ्या मनाला चेन नाही.

इंद्र--अशी कोणती गोष्ट आहे की, आपल्या सारख्या चतुरालाहि तिचा एवढा बाऊ वाटावा

नारद--( सचित मुद्रेने ) भगवान्‌ जो अवतार घेगार आहेत, त्या अवताराची आधीं समग्र कथा इलोकरूपानं लिहिणारा कवि-पहिला कवि- शोधायला पाहिज,

इंद्र--( मोठ्यानं हसून ) अं, अवढेच ना ! मग त्यांत असं बिच कण्या- सारखं काय आहे निष्कारण राईचा पवत कडून तुम्हीं तळमळत राहिला आहांत. तुमच्या बोलण्याची मला तर फारच मौज वाटते. तुमचा स्वभाव भारी विनोदी आहे बुवा !

नारद--( गेभीरपणानें ) ही गोष्ट अशी थट्टेवारी नेण्यासारखी नाही.

इंद्र--मला तर यांत कांहीच कठिण बाटत नाही. पार्यांतला कांटा काढा- यला पहार काय करायची अहो, कवींना हो काय तोटा ! या आमच्या अमरावती नगरींत कवींचा अक भला जंगी कारखाना निघालाय, आणि एककरा रत्नाची कल्पनाशक्ति तरी काय प्रचंड म्हणतां. अगदी आकाशगंगेचा धबघ- बाच ! बोलायची म्हणून सोय नाही, एकाच अवताराची कथा ती काय पुढं- मागं होणाऱ्या आणि होणाऱ्या अवतारी कथा अगदी अवतार आल्याप्रमाणं तोंडपाठ लिहून काढून तुम्हांला या पेचप्रसंगांतून ते खास मोकळं करतील. एकवेळ नमुना तरी पहा ! अक पंडित तर असा आहे म्हणतां कों ज्याचं नांव तें ! त्यानं स्वतांचं डोकं चालवून एक भयानक मृत्युगीत रचलंय. अगदी वज्रच म्हणाना ! तं त्या बोकाळलेल्या देत्यांना नुसतं वाचायला द्या. निदान त्यांतली

अंकरश्ला.

दोनचार अक्षरं त्यांच्या वाढलेल्या कानांवर पडतील अमं करा. म्हगजे काय गमत होते ती पहा तर खरी. अवतार घेण्याची गरज सुद्धा भगवंतांना पडायची नाही,

नारद--( वेतागानें ) अमृताच्या तुडुंब डोहांत डुंबणारी तुझी ती इंद्रप्री आणि अप्सरांच्या उडत्या पद्राचा वारा खात वरच्यावर तरंगणारे तुझे ते प्रणयी कवि, यांचा पृथ्वीला नांवापूरताहि उपयोग होगार नाही. दुःखाच्या खाझीचं खरंखुरं चित्र रेखाटायला ती आग पिऊन जगलेला जीव हवा ! पृथ्वीतलावर अजून कवि आगि काव्य यांचा जन्म व्हायचा आहे. तथापि अवतारलेखनाचं कार्य करूं शाकतील अश्या प्रतिभासंपन्न माणसांची पृथ्वीला उगीव आहे, अशां- तलाहि भाग नाही. तिला स्वगोच्या तोंडाकडं पहात बसावं लागणार नाही असं मला वाटत.

इंद्र --असं असतांना तुम्हांला इतकी हुरहुर कां वाटते, हें एक मोठं कोडंच आहे.

नारद--प्रभूंची अट अशी आहे को, या भावी रामावताराच चरित्र एकाद्या सत्पृर्षाकडून लिहून घतां, मुळांत पतित अन्‌ पापी असलेल्या माण- साला आधीं शुद्ध करून नंतर त्याच्या करवीं ते करवून ध्यावं--

इंद्र--सरळ वाट सोडून मुद्दाम वाकड्या वाटेनं जाण्याचं क!रण

नारद---सज्जन स्वतांचा उद्धार करून घेतील यांत आरचय नाही. अना- थांचा आगि अवनतोंचा उद्धार होणं, ही गोष्ट तितकीच महत्वाची पग बिकट अशी आहे. परमेश्‍वर हा पतित पावन आहे. तेव्हां ्पांतताला पावन करून त्याच्या मुखानं भगवंताचं नवं स्वरूप जगाच्या कानीं घालण्यांत स्वाथ आहे आणि परमाथहि आहे. इश्वर हा चराचरांचा पालनकता आहे. तथापि त्यांतल्या त्यांत तो पददलितांचा आणि रंजल्या गांजल्या जीवांजा खरा केवारी आहे, हें सत्य, या कृतीनं सिद्ध होणार नाही कां£ पग असा माणूस मला सापडगार कुठं

अन्‌ तो पहिला कवि कस होणार !

शट पाहिला कावे

इंद्र-”( विचार केल्यासारखे दाखवीत ) तुमच्या म्हणण्याचा अथ आतां मला कळून चकला. याला एक उपाय मी सुचवितो, पहा पसंत पडतो का! आपण दोघे मिळून मानवांच्या जगांत जाऊं आगि त्या दृष्टीनं प्रयत्न करूं. परमे- इवरी कायीला थोडाफार हातभार लावल्याचं भ्रय मला मिळेल,

नारद--( कांहीशा तुच्छतेने ) हा, तेवढं साहस मात्र करू नकोस ! तुझ्याबरोबर माझ्या सारख्यानं असणं म्हणजे शालजोडीला ठिगळ लावल्याप्रमाणं होईल. म्हणून म्हणतो कीं, तूं आपला तुझ्या ऐसपैस स्वगीत असलेलाच बरा. आकाशाच्या कोंदणांत लुकलुकगाऱ्या दिखाऊ हिऱ्यानं आपली जागा सोडून खालीं येण्याचा हेका धरूं नये. जाणो, कदाचित्‌ त्याचा एकदम दगड बनन 'पथ्वीच्या कपाळीं तो कायमचा आदळायचा ! माझ्या जन्याप्राण्या झोळीला हें स्वर्गांच जडजवाहीर कसं झेपेल नंदनवनांतल्या गोंडस गुलाबाला जगांतली उष्ण हवा सोसणार नाही. मी पडलों--'बारा पिंपळावरचा मुंजा !' कुठंहि जाईन अन्‌ कांहीहि करीन. त्यांत मला कोणी हसणार नाही. पण तुझी गोष्ट तशी नाही. आपलं काम आपण करावं हें ठीक. शिवाय परमेश्‍वर आपली इच्छा कशी पूण करून घेतो. हें कुणाला कळायचं नाही. त्याचीच प्रेरणा मला या समयीं योग्य दिशा दाखवील, तुझ्या सहानुभतीचा मी फार आभारी आहे. बोलण्याच्या भरांत वेळेचं भान राहिलं नाही. बरं तर, येतो मी आतां. ( भजन करीत जातो. ) इंद्र-ापण या प्रकरणाचं काय होतंय, तें मात्र मला सांगायला विसरू नका हं! ( जातो. )

१९ प्रवेश दुसरा

>>.

( स्थळ--अयोध्येच्या वशीजवळची निवांत जागा. निळू चाहूल घेत प्रवेश करतो. )

निळू--इथं असं उभं राहून माझे पाय जड झाले. सर्भावार वेड्यागत बघून माझे डोळेहि भरून आले. पण इचा अजून ठिकाण नाही. सारीं कामं सोडून तिची भेट घेण्यासाठीं मी या ठिकाणीं जिवाची बावडी करून यावं आणि मी नेमका यंगार हें तिळा माहीत असूनहि तिन माझ्यापासून फटकून दूर रहावं ! या प्रीतीच्या नादाने मागूस कसा नि कुठं वहात जाइल हें सांगतां यायचं नाही. फार लांब कशाला ! आतां माझीच गोष्ट पहाना ! वाल्या कोळ्याच्या तालमींत मी एक मुरलेला गडी, आजपर्यंत कितीकांना मी हातोहात फसवलं, पग या नखरेल पोरीनं बघतां बघतां मलाच चकवले. आमच्या वाल्याची शिस्त फार कडक आहे. ह] माझा नवा छंद जर कां त्याला कळला, तर हां हां म्हणतां माझी चटणी उडेल ! प्रीतीच्या तारा छटून त्या तुटण्याच्या बेतांत आल्या, तरी ही गहिरी तारा उगवायचे चिन्ह दिसत नाही. ( थोडा चेळ थांबून ) असं तर झालं नसेळ ! मी आपला तिच्या चरणांचा ताल धरून इथं असाच लोंबकळत पडायचा अन्‌ ती चटक चांदणी कुणाच्या तरी नजरेंत भरायची. खरोखर, केवढा वेडा आहे मी ! तिचा नाजुक हात माझ्या गळ्यांत पडावा म्हणून बगळ्यासारखी मान उंच करून कावळ्याच्या डोळ्यान तिला मी टेहळीत आहे. पण एकादा गुप्त यमदूत अचानक दत्त होऊन आपला काटेरी हात माझ्या गळीं टाकायचा. छे, हे उपयोगी नाही. ( कुणाची तरी चाहूल लाबते. तो दचकतो ) समोरून तें कोण इकडंच येतंय काळू तर नसेल! या चेळीं इथं हा अचूक कसा .आला---या तारेवर त्याचाहि डोळा आहे काँ काय त्याच्या दृष्टीस आपण इतक्यांत पडूं नये. अहो, फू म्हणतां ब्रह्महत्या म्हायची, ( हात जोडून ) देवा, दया कर अन्‌ त्या तारेला आतांच इथं येण्याची

२० पाहिला कावे

दुबुद्धि देऊं नको. या झाडा आड लपून राहून पहावं. ( लपून राहतो. त्याचा मित्र काळू येतो. )

काळू--सकाळपासून हा निळू गेलाय तरी कुठं त्या गुहेपाशी मी त्याला ओझरता पाहिला. तेवढ्यांत माझा डोळा चकवून तेथून तो निसटला. त्याचा माग काढीत इथवर मी आलों. अलिकडं तो कसल्यातरी फंदांत पडल्याचा मला दाट संशय येतो फुकट दुसऱ्याच्या कामांत आपण लक्ष कशाला घाला ! तो कांही का करीना, मला काय त्याचं आपलं काम आपण करावं म्हणजे झालं. ( जाऊं लागतो. )

निळू---( हलकेंच पुढें ग्रेत ) तारा दिसेल म्हणून मी आतुर झालों तर हा धूमकेतू मधेच उपटला, माणूस करायला जातो एक अन्‌ होतं भलतंच. ती आतां इथ आली तर साराच घोटाळा उडणार. काय करावं या फुटक्या नशिबाला ! वेळ तर निभावून नेली पाहिजे. त्याशिवाय धडगत लागायची नाही. मळा वाटलं ही पीडा जाइल, पण हा पुन्हा मागंच वळला. तर आतां असंच करावं. ( काळू परत येतो. ) ए, काळू ! मला शोधायला तूं आलास अन्‌ मला बघतांच परत निघालास बारीक नजरेनं इकड तिकडं कायरे पहातोस काळू---मधांपासून मी तुलाच पहातोय. निळू--मी तर तुझ्यासमोरच उभा आहे. ' काळू--मग इतका वेळ तू मला कसा दिसला नाहीस ? कुठं लपून बसला होतास काय निळू--उजेड असो अथवा अंधार असो, आमच्या सारख्यांना लपून राहणं अन्‌ जपून चालगं भाग पडतं. काळू---पण मला बघून तू लपून राहिलास याचं फार आश्‍चय वाटतं. तुझा हा ल॑पडाव जरा निराळाच दिसतोय. हा डाव दिवसाउजेडीं गांवालगत खेळण्यांत एकादे वेळीं अलगत गळा गुंतेल ! या लपंडावांतला तुझा तो खळ-

अंक? ला २१

गडी कुठं दिसत नाही मला पाहून तूं त्याला लपवून तर ठेवला नाहीस ना ! तुझा कांही नेम नाही म्हणून विचारतो. ( आसपास सूक्ष्म दट्टीनं पाहतो. )

निळू--( त्याचा खांदा हलवीत ) हें बघ गड्या ! तसला लपवा- छपवीचा प्रकार इथ बिलकूल नाही. मी आधीं तसा लपून राहिलों नाही आगि कुगालाहि लपवून ठेवलं नाही. तूंच माझा खरा खळगडी आहेस !

काळू--मग मला झुकांडी देऊन तूं इकडे गुपचप कसा झकलास तूं जरी तं माझ्यापासून चोरून ठेवलंस तरी तुझा एकंदर रागरंग माझ्या ध्यानीं आला आहे. चोराचीं पावलं चोरालाच कळतात !

निळू-संशयाच्या पिशाच्चाने तुला पठाडलंय,. आंत एक अन्‌ बाहेरे एक असे मी निदान माझ्या मित्राज्ली तरी कधीं करणार नाही.

काळू--होय ना! मग सांग तर पाहूं ! मला चुकवून तूं या आडजागीं कां आलास अन्‌ काय करीत होतास

गिळू--काल संध्याकाळीं मी आपला सहज फिरत फिरत या बाजला आलों. एक छानसं सावज मी हेरून ठेवलंय. अगदी बावनकशी सोन्याचा खजिना आहे. तें जर आपल्या जाळ्यांत सापडलं तर आपली अगदी चंगळ उडेल. त्याला कसं पकडायचं ते मी ठरवून सुद्धां ठेवलय. पग तुला पहातांच तं बावरेल आणि चटकन उडून जाईल. |

काळू--मला हें खरं वाटत नाही. तू मला बनवुं पहात आहेस. अरे, ज्या गांवच्या बोरी त्याच गांवच्या बाभळी ! तुझं हें सावज नेहमीपेक्षा खास निराळ्या रंगाचं असावं, पण म्हटलं जपूस एस ! मोकळं रान सापडलं म्हणून शिकाऱ्यान वोटेल तसे बाण मारूं नयेत. चुकून एकाद्या चेचल हरिणीच्या गहिर्‍्या नजरेनं घायाळ होऊन खालीं पडण्याचा कठिग प्रसंग यायचा. असले उद्योग करायला केव्हापासून शिकलास ?

निडू--जें काय बोलायचं असेल तं एकदा बोलून घे. तूं माझ्याहून वडील आहेस, अन्‌ एका अथोनं या धंद्यांतला गुरुह्ि आहेस. नमस्कार गुरुमह्वाराज |

२२ पाहिला कावे

काळू--( हरत ) असल्या दिवट्या चेल्याशीं गांठ पडल्यावर गुरूला आपलं चंबूगवाळं गुंडाळून पळून जावे लागल.

निळू--( आंबट चेहरा करून ) मी तुला खरं तें सांगितलं तर तें तुला खोटं वाटतं. आहे कीं नाही जगाचा उलटा न्याय ! माझा कारभार अगदी सरळ असतो. दुसर्‍याच्या पायांत आपला पाय घालून त्याला खाली पाडण्याच्या कामांत तुझा हात धरणारा कोणी नाही. माझ्या पाठीला असा हात धुवून कां लागला आहेस १८ खर सांगू तुला, नाइलाजानं मी या आडवाटेला लागलां.

काळू-तें काय विचारावं ! हे तुझे चोरटे चाळे माझ्यापुढे चालणार नाहीत. बरेच दिवस मी पहातो आहे, तुझं लक्षण मला कांही ठौक दिसत नाही. भलत्या भानगडींत पडून तूं आपला गळा गुंतवून घेशील अन्‌ आमच्य़ा गळ्या- वर पाय देशील, अशी मला भीति वाटते. अलीकडं पहिल्याप्रमाणं खुल्या दिलानं तू माझ्याशीं वागत नाहीस, हें बरं नव्हे ! वेळींच ताळ्यावर य, नाही तर तुझ्यांत झालेला हा घातुक बदल मला वाल्याला कळवावा लागेल, मग तुझे हाल कुत्रादेखील खाणार नाही !

निळू-तुझ्याबद्दल माझ्या मनांत पूर्वी इतकाच आपलेपणा आहे. तसं पहिलं तर माझ्यांत कांही बदल झाला नसून तुझच मन पालटलंय. मी तर असं चक्क म्हणतो कीं, मला हुडकण्याचं निमित्त मात्र तू पुढं करीत आहेस. तूंहि कसल्यातरी नाजुक नादांत अडकला आहेस, हें तुझ्या मुद्रेवरून दिसून येतेयू. मी तुला पुरतेपणीं ओळखतो. माझ्यावर उगाच आळ घेऊन तूं आपली लबाडी लपवू पहातोस. कर नाही त्याला डर कसली

काळू---( आजवी स्वराने ) निळोबा; असा बिथरून जाऊं नकोस ! अरे, मी आपलं चेष्टेने बोललों इतकंच. तू ते मनावर घेण्याचं कारण नाही. पग काय रे ! असा कावरा बावरा होऊन तूं इकड तिकडं काय़ बघतोस ( हसत ) तुला भेटायला कुगी येंगार आहे का ! माझी अडचण होत असेल तर मी आपला निघून जातो. एकाच पिसाऱ्याचीं आपण पाखर आहोंत.

अंक? ला -$-

निळू--( कटाळून ) माझ्या राशीला तूं असा कां लागला आहेस तुझ्या पिसाऱ्यांत तूं मला बळेंच गुरफऱून टाकू नकोस, तुला एकदा सांगितलं ना ! मला भेटायला कुगी येणार नाही आणि मीहि कुगाला भेटणार नाही.

काळू--तूं कांहीहि म्हण, पण तुझं चित्त आज ठिकाणावर दिसत नाही. माझ्यापासून तूं नक्की कांही तरी लपवून ठेवीत आहेस. या तरुण वयांत माण- साला असे होतं कधी कधी, पग आपलं बीळ सोडून उंद्रानं असं उघडयावर वावरू नये. अकादा बोका पट्दिशीं झडप घालायचा !

निळू---.: चिडून ) ए, काळ्या ! तुला आज झालंय तरी काय आं, तूं चालवलं आहेस तरी काय तुझ्या आडव्या तिडव्या ओलण्यानं माझे कान किटून गेले, ( कानावर हात ठेवतो. )

काळू--मला कांही झालं नसून तुला मात्र कांही तरी होत आहे हं अगदी खास ! तूं होय म्हण किंवा नाही म्हण. पण तुझी ही अंतराळी अवस्था पाहून मला तुझ्य़ाविषयीं थोडं निराळे वाटू लागलंय. चेहरा हा मनाचा आरसा आहे !

निळू--तुझ्या मनांतली मळमळ एकदाची ओकून टाकून मोकळा हो बघूं कसा ! मला पटलं तर मी होय म्हणेन.

काळू --“( स्वर बदलून ) काय रे निळू, तूं कुणाच्या प्रेमाबिमांत पडला आहेस कां

निळू--. हसून ) कांही तरी शोलतोस झालं. माझ्यावर रे कोण प्रेम करणार ! काळू---तं मी कस सांगूं ! तुझे गुपीत तुलाच ठाऊक, आपल्यावर कुणाचे तरी प्रेम अतावे किंवा आपलं कुणावर तरी प्रेम असावं, असं तुला नाही वाटत - निळूट-मला पुष्कळ वाटतं. पण अशी संधी माझ्यासारख्या दरवेशाला कशी मिळणार ! तुझे कधी कुणावर प्रेम बसलं होतं कां रे!

२७ पहिला कवि

काळू--बाबा, तें असे सांगून समजत नसतं. ज्याचे कोडे त्यानंच सोड- वाचे. त्यांत दुसऱ्याचा हात शिरकला कीं गुता झालाच म्हणून समजावे, प्रेमाच्या पाणपोईवर तिर्‍्हाइताच्या हातानं पागी पिऊन तहान भागत नाही !

निळू--हें बघ काळू, ज्यासाठी माणू. आपला जीव गहाण टाकायला तयार होतो, असं एवढं त्या प्रेमांत असतं तरी कायरे

काळू---तू अजून थच्चा आहेस. प्रेमांत काय असतं म्हणून तूं विचारतोस ! अरे, त्या प्रेमांत अवघं ब्रह्मांड साठविललं असतं, प्रेम ! किती गोड शब्द आहे हा ! उसळणाऱ्या तारुण्याला मुससुसणारी प्रीति आनंदाची भरती आणते. तिच्या त्या गोड पंगीनं गंगी येणारा प्राणी, खरा हतभागी होय ! मिळाले तर प्रेम हे॑ अमृत आहे, नाहीतर त्याच्या सारखं प्राण घेणारं विष जगांत दुसरं नाही. या प्रेमामुळ॑ मोठमोठे मुनी आणि देवहि वेडे झाले. आपण तर सामान्य माणसं आहोंत.

निळू--( त्रासिक. मुंद्रेन ) काळोबा, हो जंगली रहाणी मला नकोशी झाली आहे. साध्या माणसाप्रमांग या पुढं आपलं आयुष्य कंठण्याचा मी विचार केला आहे. तुला ते आवडो वा आवडो !

काळू--शेवटीं झुडुपांत लपलेला ससा बाहेर पडला म्हणायचा. निळू-टप्रत्येक गोष्टीची तुला आपली थट्टाच वाटते.

काळू--तसं नव्हे रे निळू ! खरं म्हणशील तर माझा देखील विचार तसाच आहे. या वाल्याच्या मार्ग लागून जन्माच दिवाळ निघायची पाळी आली. आपण आहों म्हणून त्याला कांही कमी पडत नाही. पण आमची किमत त्याला आहे कां हा जुलमाचा रामराम आतां पुरे झाला. अकादा स्वांगळा जोडीदार पाहून स्वतंत्र संसार थाटण्याचे माझ्या मनांत राहून राहून येतं. पण हें जमणार कसं अन्‌ कधी !

ळू---प्रेमाशिवाय जगण्यांत राम नाही असं माझं तर ठाम मत आहे.

अंक ?१ ला २१५

काळू--तुह्या मनाची इतकी तयारी झाली आहे तर? तरीच मला वाटलं तें खोटं ठरलं नाही.

निळू--तू आहेस तसा मनकवडा. आपला हा बेत त्या आम्या वेताळाच्या कानीं जातां कामा नये. तसं झालं तर आपलीं शंभर वष भरलींच म्हणून समज, दगडाखालीं सापडलेला हात मोठ्या युक्‍तीनं काढून घ्यावा लागतो.

काळू--पण या ठिकाणीं तूं असा ताटकळत किती वेळ उभा राहणार प्रीतीच्या प्रांतांत फार सावघगिरीनं पाऊल टाकावं लागतं. हा रोग माणसाला एकदा जडला कों, त्याला कशाचंहि भान उरत नाही. तीच कठिण अवस्था सध्या तुझी झाली आहे.

निळू--[ उपहासानें ] ज्या रंगाची काच डोळ्यांसमोर धरावी त्याच रंगाचं सभोवारचे जग पहागाऱ्याला दिसतं. तुझ्या प्रेमाची बाधा तूं माझ्या अंगाशी आणीत आहेस. खाई त्याला खवखवे दुसर॑ काय

काळू--एका अगदी जरूरीच्या कामासाठी मला परत फिरलं पाहिज. अरे, आकाशाकडं डोळे लावून का कुठं चेचल तारा प्रसन्न होत असते ! [ निळू चपापतो ] हा वेडेपणा सोडून दे. चल ! [ त्याचा हात धरतो. ]

निळू--( काळूचा हात झिडकारून ) तुझ्या बरोबर मी आलों असतो, पण त्याचं असं झालयं कीं, ही जागा सोडून मला जातां येत नाही. खरंच काळू, वाल्यानं एक जोखमीची कामगिरी मला दिली आहे. ती पार पाडल्या- शिवाय मला इथून कस बरं हलतां येईल

काळू---तुझ्या डोक्यांत हें नसतं खूळ शिरलंय. पण निळू, हा विस्त- वाशीं खेळ आहे हं !

निळू--ऊं, मला माहित आहे तें. दुसऱ्याला खुळा म्हणणारा शहाणा हा कित्येक वेळा स्वतांच खुळा होत असतो. तुझ्याशीं बोलण्याची सोय नाही. तुला सांगायला गलों तर तूं मला टांगायला आलास. चालूं दे तुझं एरंडाचं गुऱ्हाळ, ( पाठ फिरवून निघून जातो. )

२८ पहिला कवि

काळू--( त्याच्याकेड पहात ) हा तर मला पुसतांच वाट चाळू लागला, या निळ्याला मी नाकासमोर जाणारा प्राणी समजत होतो. पण हृ! नाकावर माशी देखील बसूं देत नाही. कांही काम नसतां हा एवढा वेळ इथं घुटमळत राहिला होता, त्या अर्थी यांत कांहीतरी गोम असावी. खरंच, तसं जर असेल तर तो आपसूख परत येईल. प्रेमांत पडलेल मागूस म्हणजे दुधाला चटावलेलं मांजर ! आपण त्याच्यावर यापुढे पाळत ठेवावी. म्हातारीनं कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं थोडंच राहतं ! ( जातो. )

प्रवेश तिसरा

( स्थळ->अरण्य, नारद भजन करीत यतो )

(२) नारद--करुणामय नारायण मंगल गा ! नाम मना ६० प्रभुराया प्रिय झाला आवडिनं आळाविला ब।रुनिया झणि माया दिव्य निधी दे स्वजना १॥

( सर्भावती पहात ) अहाहा ! हरिनामाची माधुरी कांही निराळीच आहे. हें स्थान तर किती रम्य आणि प्रशांत आहे ! सहज मनोहर वैभवानं नटलेल्या या निसगेराजाच्या राज्यांत परमेश्‍वराचं सुरम्य स्वरूप अनेक प्रका- रांनीं आणि आकारांनीं खेळेत असल्याचा मनाला भास होतो. मंजुळ वायूची वीणा बनवून ही सुंदर वनराणी ठिकठिकाणीं आपल्या गोड गळ्य़ानं त्या विश्‍व- व्यापी प्रभूचं गुगगायन करीत विहरत आहे. नव्या पानाफुलांनीं बह्रलंली ही

अंक१ ला २७

वृक्षराजी, त्याच दिव्य आनेदाच्या नादांत रंगून डोलत आहे. रुप्याच्या ओघळा --प्रमागं कडेकपारींतून पाझरणारे हे चिमणे झरे--हिरवळीवर स्त्रेरपणानं बागड-. णारीं हो. गोजिरवाणीं हरणं--सभोंवार नव्या नवलानं गोड किलबिल करीत खळणारीं हों रंगीबेरंगी रानपाखर॑ आणि मोहक सृष्टिव्दरीचा रंगलेला हा सारा. आनंदी संसार माझ्या मनाला कसा मोहून टाकीत आहे ! ( एकदम आठवण झाल्यासारखं देवून ) अरे हो, या अपूव आनंदाच्या भरांत एक गोष्ट मी अजिबात विसरून गेलां होतो. बरी आठवण झाली. पग मला हवा असणारा माणूस या आडरानांत कसा सापडणार |! याच ठिकाणीं मळा नकळत घेऊन येण्यांत नियतीचा कांही विशिष्ट हेतु तर नसेल ! हो, तसेच असले पाहिज. त्याखेरीज गांवांत शिरतां या रानांत येण्याची बुद्धि मला झाली असती कां ( भजन कू लागतो. वाल्या कोळी खांद्यावर फरशी कुऱ्हाड टाकून प्रवश करतो. )

वाल्या--( स्वगत ) आजचा दिवस जरा वेगळा दिसतो. ( उघड ) ए, गोसावडथा ! कुठं निघालास एकदम उभा रहा.

नारद---( भ्याल्यासारखें करून ) कोग £ ठटारू

वाल्या--मी नव्हे. तूंच खरा लटारू--पकक्‍्का गळेकापू आहेस. बघतोस काय असा |

नारद--तें कसं काय बुवा !

वाल्या--( पुढें पाऊल टाकून ) तूं कता आहेस तुझा हा वेषच सांगतो आहे. वरून संभावित आणि आंतून सोदा ! या तुझ्या भगव्या छाटीला किती अमंगळ पुढं चढलीं असतील ते एक तुलाच माहीत. मेंढराचं कातडे पांघधरलं म्हणून लांडग्याचं अंतरंग झाकत नसतं.

नारद--खासा न्याय ! अरे, तूंच स्वतां खाटीक बनून गरीब वाटसरांच्या माना छाटतोस, आणि या सोवळ्या बाल ब्रह्मचाऱ्याला लांडगा म्हणतोस, काय, म्हणाव काय तुला

1२८ पहिला कवि

वाल्य़ा--. हेटाळशीच्या स्वरांत ) असले नकली साधु मी पुष्कळ पाहिले आहेत. वाण बदलला म्हणून गुण कांही लपत नाही. तसं असतं तर सगळेच कावळे राजंहस झाले असते. लग्नाचा पाश गळ्यांत अडकवून घेतां प्रेमाची रासक्रीडा करायला हें रंगित सोंग एक उत्तम साधन आहे. तुझा हा बिनभांड- वली धंदा चांगला चालत असेल नाही

नारद--नारायण, नारायग ! भल्या माणसा, माझ्यावरचा तुझा हा आरोप अगदी अनाठायीं आहे. स्वप्नांत सुद्धा मी कधी कुणाचं वाइट चिंतलं नाही. स्वतां हरिनामाचा गजर करावा आणि दुसर्‍यांना भगवंताचा महिमा वीन .कहुन सांगावा, हें माझे पवित्र कार्ये. केवळ त्यासाठीं मी असा बुवा होऊन जगभर फिरत असतो.

वाल्या-<( उपहासपूबक ) आपल्या सारख्या संतांचे दर्शन म्हणजे एक अपूर्वे पवेणीच. आपला वेत फार नामी आहे वुवा ! तुमच्या या रेशमी जाळ्यांत आतापर्यंत बरींच नाजूक फुलपाखरं सापडलीं असतील पण काय हो ! गांवची सरळ वाट सोडून अशा आडवळणाने या जंगलांत कां शिरलांत का एकादी अल्लड वनबाला तुमच्या भजनीं लागली आहे ? तुमच्या सारख्या तरुण ब्रह्मचाऱ्यांचा अन्‌ रंगेलरावांचा कांही नेम नाही म्हणून विचारतो. जाल तिथ मजा कराल ! पग म्हटलं सांभाळून अता. या वाल्या कोळ्याशीं गांठ आहे. एक घाव कीं दोन तुकडे !

नारद--( शांतपगानें ) मायेचा पाह नसलेल्या आम्हां सुशाफिरांना गांव आगि रान दोन्हीहि सारखंच. मागसाच्या जन्माला येऊन असा एकाद्या जेगली जनावराप्रमागं वार्गू नकोस. अजून वेळ गेली नाही. नीट शुद्धीवर ये आगि आपल्या हिताचा मागे धर !

वाल्या--तुझा वेदांत जरा बाजूला राहू दे. तशीच निकड लागली तर सवड काढून तुझ्याकडं घाव घेईन. ( आवाज चढवून ) मी सांगतो तसं आधी कर ! तुझ्याजवळ काय असेल नसेल ठे काढून ठेव, असा बेरडागत काय

अंक ला २९

बघतोस £१ तंबोऱ्याची खुंटी पिळल्याशिवाय सूर लागायचा नाही. ( कुऱ्हाड उगारून ) हां, आटप लवकर !

नारद---( मागें सरकत ) अरे, जरा ऐकशील कीं नाही. का आपलं : ऊठ सोट्या कूर !' असा माजलेल्या रानरेड्याप्रमाणे शिंगं रोखून माझ्या अंगावर चाळ करून येऊं नको. हें बघ, माझ्यापाशी पेसा अडका-- कांही म्हटल्या कांही नाही ! मी आपला एक साधा गोसावी. मला गरीबाला उगाच कां छळतोस

वाल्य़ा<>गोसावडा अन्‌ गरीब--साफ खोटं ! नाग आहे आणि म्हणे फडा काढीत नाही--असं कधी झालंय कां हातांतल्या राखुंडीची चिमूट भोळ्य़ा बाय़ाबापड्यांचा डोळ्यांत फुंकून, त्यांचे डबोले बघतां बघतां काखेत मारून पसार होगारे असले केक लफंगे मी लब केळ आहेत.

नारद-_हा तुझा निवळ भ्रम आहे. मला अडविण्यांत तुला तसलं कांही मिळणार नाही, आगि याचंच मला, तुझ्याकडे बघून फार वाइट वाटतंय. तुला वाटतोय तसला मी मुळीच नाही.

वाल्य़ा--( जरा पुढें होऊन ) मग असा मुरकत मागं कां सरकतोस तुम्हां काटोखांतल्य़ा काळभैरवांपेक्षां आम्ही उजेडांतले वाटमारे फार बरे ! तुझ्या असल्या गुळच2 बोलण्यानं मी बनायचा नाही. तू दिसतोस तसा मुळीच नाहीस. वाहत्या पाण्यापेक्षा संथ पाण्यालाच रावाळ अधिक बिलगतं !

नारद--मल) घर ना दार | माझ्या सारख्या भटक्या भिक्षेकऱ्यापाशीं असणार तें कायर [ थोडी आठवग करून ] हो, पग थांब ! एक अमोल ठेवा माझ्याकड आहे. तो जर तू आपलासा केलास तर तुझ्य़ा उभ्या जन्माची ददात कायमची मिटेल.

वाल्या--[ मिष्किलपणानं हसत ] वा, छान ! मग घोडं अडलयं कुठ आपला माल आपखुशीनं आमच्या हवाली करणारं गिऱ्हाईक भेटल तर त्याचा भार हलका होईळ आणि आमचीहि दगदग वाचेल. इकडं आण तझी

३० पांहला काव

ती बहुमोल ठव, मी नी: जपून ठेवीन हं ! तू त्याची मुळीच काळजी कहूं नको. हं, आण वघूं इकडं !

नारद--[ गंभीरपगानं ] तो ठेवा असा डोळ्यांत भरणार नाही कीं हातीं मावगार नाही. मनची खूग मनांतच ठेवावी लांगेल. माझ्याकडे स्थिर दृष्टीनं बघ आगि सावधान चित्तान॑ श्रवण कर, अन्‌ मुखानं मी सांगतो तसं सारखं म्हणत रहा ! ज्यापुढं अवघ्या दुनियेची दौलत फिकी पडेल, असं ते मधुर अन्‌ मंगल रामनाम आपल्या हृदयांत कोरून ठेव--

(३) नामसुधा सुखदा, जिवा हो खावेत जा तू सदा घ० नवनामाचा मंगळ महिमा रूपगुणांही नाहो सीमा त्या प्रमाला नलगे उपमा दूर करी आपदा १॥ येइल उद्या राम जगा या सावध हो, यश त्याचे गाया शांति निरंतर वितरी हृदया खुंदर ती संपदा ॥२॥ वाल्या--[ दरडावगीच्या स्वरांत ] अरे चोरा ! मला गुंगत ठेवून दंडी मारायचा विचार आहे वाटतं तुझा बच्चाजी, तुझ्या गमजा माह्यापुढं चालायच्या नाहीत. [ झटकन्‌ पुढें होऊन त्याची मान पकडतो. ] नारद--[ काकुळतीनें ] अरे, जरा दमानं घे रे ! मला बोलायला थोडी सवड देशील कीं नाही. माणूस आहेस कीं कोण आहेस : तुझं बरं करावं म्हणून मी आलों तर तूं आपलंच खरं करूं लागलास, मी कांही कुठं पळून जात

अंक? ला - 4

नाही. कृपा कर अन्‌ जरा दूर हो पाहूं आधीं किती जोरानं माझा गळा दाबलास ! [वाल्या त्याची मान सोडून दूर होतो, ] मला मारून तुला मिळणार तरी काय |

वाल्या--तुझ्याबरोबर फुगडी घालायला मी मोकळा नाही, [ आसपास नजर टाकून |] तुझी झोळी तिकडं लपवून ठेवलीस काय तरीच तूं सारखा मार्ग वळून पहात आहेस. त्या झोळींतला तो पिवळा गोळा तूं मुकाट माझ्या स्वाधीन कर ! त्या शिवाय मी तुला मोकळा सोडणार नाही.

नारद--परोपरीनं तुला सांगून पाहिळ पग “* पालथ्या घाग्रीवर पाणी ) ! हा वीणा, ही माळ, या चिपळ्या अन्‌ खडावा--हा माझा सारा सरंजाम तुला अपंग करतो. [ त्या प्रमाणें करतो कंबरेवर हात ठेवून त्याच्यापुढे उभा राहतो.

वाल्या--[ वैतागून ] या कवडी किंमतीच्या वस्तू घेऊन मौ काय करूं £

नारद---हो बाबा अन्‌ भजन करीत दारोदार फौर ! तोंड वर करून भीक मागगं हें खालीं बघून गळे दोषण्यांपेक्षां खास वाईट नाही.

वाल्या--[ निराशेनं ] करायला गेलो एक अन्‌ झालं तिसरंच. हें बिनमधाचं मोहळ हातीं लागलं.

नारद--दुःखाच्या मधमाशा तू आपल्या भोंवती उगाच कां उठवीत आहेस ! इतका घोटाळ्यांत काँ पडलास £ हा साज चढीव अन्‌ चल माझ्या बरोबर ! ( त्याचा हात धरून ) हं, थांबलास कां उचल पाय-

वाल्या--( त्याच हात दूर करून ) छे, तें मला मुळींच जमणार नाही. हा तुझ्या शिगगार तुलाच लाखलाभ होवो! एकूग सगळी खटपट अंगलट आली म्हणायची. तें कांहीहि असो, तू तर माझ्या हातीं प्ापडलास आहेस ना ! भुकाळू वाघ कसल्याहि सावजावर शेवटीं झडप घालतोच., ( डोळे वटारून ) हं,

१३२ पहिला कवि

घे तुझ्या देवाचं नांव. तुला अपताच वरती रवाना करतो. (त्याच्या डोक्यांत मारण्यासाठी कुऱ्हाड सरसावतो. )

नारद--( निर्भयपणारने ) सावध हो, पन्हा ऐक- तूं अजून सावध हो! अस भलता अविचार करूं नकोस. दीन दुबळ्य़ांच जीव घऊन तुझ्या जिवाला कधीही समाधान मिळणार नाही. विष पिऊन कोणी जगला आहे का १? मरायला मी तयार आहे. पग लक्षांत ठेव, हा अत्याचार अखेरीस तुझाच कपाळमोक्ष करील ! कडूलिंबाच्या झाडाला गोड फळे कशी लागतील असा बघत काय राहिलास-उचल कुऱ्हाड अन्‌ कर प्रहार! (वाल्या त्याचें अवसान पाहून वरमतो.)

वाल्या--साधूपणाचा कितीहि आव आणलास तरी तू आज येथून जिवंत सुटत नाहीस. (मिशीला पौळ भरीत) हा नांवाचा वाल्या कोळी आहे ! एकदा गळाला लागलेला मासा फिरून पाण्यांत जात नसतो.

नारद--[ संथपणाने ] एक प्रश्‍न मी तुला विचारतो. त्याचं मला आधी सरळ उत्तर दे अन्‌ मग मला खुशाल ठार मार ! त्याला माझी कांही अडकांठी नाही.

वाल्या--[ कुऱ्हाड खालीं करून ] काय त॑ झंर्दिशीं बोल ! नाच्या- पोऱ्यागत उगीच नखरा करूं नकोस.

९७१

नारद---हिंसा करणं हें पाप आहे. या पापांत तुझ्या घरची मंडळी सामीळ. असतीलच !

वाल्या--( अहंकारानें ) हो, यांत काय संशय

नारद--अरे बाबा, खरं पागी तर इथेच मुरतंय. सुख वागून घ्यायला सारे धावून येतात, पण . दुःखाला वाटेकरी कोणीच असत नाही! दुःख आणि पाप ज्याचं त्यानंच वोहिलं पाहिज, .हातच्या कांकगाला आरसा कशाला ! हवं असल्यास घरच्या मागसांना विचारून ये, म्हणजे तुझ्या डोळय़ा- वरची धुंदी उतरेल.

अक? ला ३२

वाल्या--( बेपवोईने ) ऊं, त्यांना काय विचारायचे त्यांत ताटाउढचीं मांजरं तीं ! जी माझी इच्छा तीच त्यांची असगार हे उघड आहे. त्यांच्या- साठीं मी रात्रंदिवस युरापारखा राबत असतो. माझा शब्द झेळून धरायला त्यांना धावत यावे लागल, तीं माझीं मागसं आहेत. माझं घर माज्यावरच फिरेळ अस तुला वाटलं तरी कसं का तुला आपलें एकांत दुसरंच दिसत !

नारद-- जसं दिसतं तसंच जर खरं असळ तर फार वरं होइल. पग

वात्रा, तसं ते नसते म्हणन माण्स नेहमी फसत आगि अखरीस कपाळाला हात

वृन बसतं. डोंगर दुरूनच साजरे दिसतात ! तुळा नको असेल तर राहूं.

माझा कांही आग्रह नाही पण तुझच त्यांत हित आहे. म्हणून पून्हा म्हणतो कीं--

वाल्या--( त्रासन ) तुझं पन्हा आपलं तेच. हरिदासाची कथा मूळ पदा- वर ! माझ्या कामांत घरची मंडळी हवीत कशाळा मी क्ररीन ती पूव ! वारा हेळ तसे गवत डुलत राहत--

नारद--मित्रा ! माझं थोडं एकशील कां दुसऱ्याचे मत आपल्या तोंडानं सांगण्यांत कदाचित आपलीच तोंडफोड व्हायची. या संसारांत कोगाची खात्री कोजी देऊं नये. झाडाकडं काणाडोळा करून त्याचीच सावली उन्हाच्या तालावर नाच लागते ! तुझ्या मागसांचा तुला अभिमान असं प्ाभाविक आहे. पग चकाकगारा प्रत्यक पदाथ सोन्याचा नसतो ! उसन्या पोठेपर्गांत तूं दग आहेस. ' गवाचे घर खालो असतं"- हें नीट लक्षांत घे

वाल्या--( विचार करीत ) तुझे म्हणणं थोडसं खरं आहे

नारद---वाकडया वाटेवरून डोळे मिररून चालण्यांत कव्हा तोल जाऊन डोकं फुटेळ, याचा नेम नसतो. '* माझीं मागसं-माझीं मागसं ' म्हगून मारे भेशीला पी भरीत तूं जोरानं गजत आहेस, पग तीं खरींच ' तुझीं मागसं * आहेत का, एकदा पाहून तर !

शै

३४ पाहिला कवि

वाल्या--( नरमाइईनें ) ब्रम्हचारी बुवा ! तुम्ही मला तर हें अवघड कोडंच घातलंत. त्याला मी ' नाही म्हणत नाही. परंतु माझी पाठ फिरतांच तुम्ही मात्र पोबारा कराल-त्याची काय वाट

नारद--त्याची तूं बिलकूल चिंता करूं नकोस. तुझी वाट पहात या समोरच्या माडाची नक्कल करीत या ठिकाणीं असा भजन करीत उभा राहीन. असाच तडक घरीं जा आगि नीट खुलासा करून सरळ माघारी थे! ( डोळे मिटून भजन करतो. वाल्या त्याच्य़ाकडे वळून पहात थबकत निघून जातो. )

अंक ला समाप्त

अकर रा प्रवेश पाहिला

(स्थळ--अयाध्यची वेत, तारेच्या भेटीसाठी अधीर झालेला निळू येतो. )

निळू--( कानोसा घेऊन ) मला वाटलं कों हा काळ्या माझा पुरताच पिच्छा पुरवगार ! माइया! प्रीतीचा खेळ त्याने ओळखला कों काय माझ्या मागचा त्याचा ससेमिरा चकवितांना माझी अगदीं पुरेवाट झाली. अहो, करतां काय £ हे काम मुळांत फार नाजूक, त्यांत तिसऱर्‍्याच्या शिरकाव झाला काँ आपल्या डोक्यांत कुऱ्हाड पडलीच म्हणून खुशाल समजावं. ( मार्गे पुढें न्याह- ळीत ) ही माझ्या मागची ब्याद एकदा टळली म्हणायची. आतां माझा जीव जरा भांड्यांत पडला. ती चटक चांदणी एवढ्यांत मला भेटेल तर सोन्याहून पिवळं होईल. इतका भाग्यवान मी आहे का! ( चाहूल घेतो. मुरकत तारा प्रवेश करत. ) अगदी बोलाफुलाला गांठ पडली. ( तिच्या जवळ जातो. ती लाजत मागें सरकते. ) असं भ्यायला काय झाल?

तारा---( लडिवाळपणांने ) मला किनई तुझी जरा भीति वाटते. थोडं लांब राहून माझ्याशी बोललास तर चालणार नाही का!

निळू--( अधीर होऊन ) हें बघ, आतां माझ्याने लांब राहवत नाही. इतके दिवस लांबून खडे टाकून पाहिले पग तें कांही नीट जमत नाही, अग तुला हें कर्स कळत नाही. गोड दुवाचा पेला ओठाशीं आला तरच त्याची खरी गोडी जिभेळा कळणार ! म्हगे लांब रहा. जवळ आल्याशिवाय असल्या गोड कामाला खरा रंग चढत नाही. तं कांही नाही. मी असा तुझ्याजवळ येणार अन्‌ तुला माझ्या जवळ घेणार, ( तिच्याजवळ जाऊन तिला धरूं पाहतो. ती वावरते. )

३द पहिला.कवि

तारा--असळा लघळपगा मला मुळीच आवडत नाही. आपली तोंड ओळख होऊन पुरते दोन दिवसहि उलटले नाहीत, तोंच तूं माझ्याशी लगट करूं लागलास, भारीच अधीरा स्वभाव आहे तुझा !

निळू--अग, दोनच दिवस काय, अवघ्या दोन क्षणांतहि प्रेमाच्या बीजाला चांगलाच अंकुर फुटतो. त्या दिवशीं तिन्हीसांजेच्या सुमारास सवेश्‍्वराच्या देवळांच्या आवारांत तुला मी सहज पाहिली, तेव्हापासून तुझ्याशिवाय दुसरं कांही मला सुचेनासं झालंय, देवाच्या पार्या पडायला म्हणून गेलो आणि या देवीचे दशन घडलं. त्या एका क्षणाची जादू कांही और आहे.

' तारा--( किंचित्‌ लाजल्यासारखें करून ) देवीचं दरन घडलं पण ती प्रसन्न व्हाथला भक्‍ताने काय करायच ठरवलय

निळु--हे माझे पंचप्राग मी तिच्या चरणीं अपण करीत आहे. ( तिच्या जळळ जाऊन तसा अभिनय कतो. ) तरी या प्रेमदेवतेनं आपल्या व्याकुळ भक्‍्ताकडं प्रमळ दृष्टीनं पहावे एवढेच एक मागगं आहे.

तारा-_तुला माझा असा ध्यास लागण्याइतकी मी सुंदर कां आहे !

निळू--खरोखर, तू मला फार सुंदर दिसतेस आणि आवडतेसहि (ती लाजून बघते. ) असं लाज नकोस गडे ! तुझ्याकडं टक लावून सारखं पहात रहावस वाटतं. लाडके, तुझ्या प्रेमानं माझं हृदय काठोकाठ भरून आलेय !

» तारा-ऱसंदर स्त्री दिसळी की पुरुषाला एकाएकीं प्रेमाचा पाझर फुटतो. पण पावसाळ्यांत तुडुंब भरून वाहणारा ओढा उन्हाळ्यांत पार आटून जातो. तुझ प्रेम माझ्या रूपावर आहे कीं--

निळू--( आनंदानें ) माझ प्रेम खरंच तुझ्यावर आहे. तुझ्या सुंदरपणानं त्याला बळकटी यायला जास्ती मदत झाली, हें मात्र खोटं नाही. दुघाची गोडी साखरेनं नाही का वाढत ! अगदी तसंच हें आहे. बाकी खरं म्हणशील तर, खर प्रेम आंधळे असते. इतर गोष्टींची तितकीशी जरूरी भासत नाही.

अंक२९रा ३९७

तारा---गोड शब्दांची साखर पेरून भोळ्या जिवाला झळवत ठेवण्याची कला तुला चांगली साधली आहे. सुकुभार मजरीला पाहून चपळ भ्रमर तिच्या भोंवती गुणगुणत राहतो आगि तीहि भोळेपणानं त्या नादांत डोळ लागते. आपल्य़ा हृदयाची ठेव त्या मनचोरानं ठटून नेल्यावर त्या विचारीचे डोळे उघडतात.

निळू-- हृदयाची चोरी करण्यांत तरुगापेक्षा तरुगीच जात्या अधिक तयार असते. एकादी लबाड गुलाब कलिका भुंग्याला आपल्या भोंबती गंगत मात्र ठेवते. एकादा मधुबिदू मिळळ या आशेनं तो अधिक व्याकुळ झालेला पहाण्यात तिला मोज वाटतें.

तारा--हें तू कशावरून म्हणतोस

निळू--तुझ्या वावतींत मला जो अनुभत्र आला आहे त्यावरून मी असे म्हणतो. माझ्या मनाची होगारी तळमळ तुला अजून कशी कळत नाही तुला वाटणारी दहोका पुढं आपोआप कमी होईल. मी तुला एकदा आपली म्हरल्यावर त्यांत असे घाबरण्यासारखं तुला काय वाटतं

तारा---एक गोष्ट मी तुला विचारते. अगदी खरं सांगशील ना !

निळू--तुइ्य़ा नि माझ्या प्रेमाला साक्ष ठेवून अगदी खरं तेंच सांगेन !

तारा--( लाजून ) यापूर्वी तू कुणावर प्रेम केलं होतेस कां

निळू--( हसून ) तुला पाहिल्यानंतर मला प्रेमाची कल्पना आली आगि त्या भरांत माझा प्रेमळ जीव प्रथमच तुझ्यावर जडला. तो आतां तिथून माग फिरणं कधीहि राक्‍य नाही ! बरं, तुझं माझ्य़ावरचं प्रेम हें पहिलंच आहेना

तारा--( पदराशीं चाळा करीत ) पुरुषाप्रमागं स्वताला काय वारते, हें धौटपणानं उघड करून सांगण्याचे स्त्रीला जमत नाही. माझ्यावर तुझा

रवास आहेना ! तुझ्याविषयी एक गोड भावना माझ्या मनाला भारून

टाकीत आहे. ( एक गोड सुरका मारत. निळू अधीर होऊन तिला आपल्या जवळ घेतो. )

३८ पहिला कवि

निळू--या एका दिव्य क्षणांत सारा आनंद भरून राहिला आहे. अशी अबोल कां झालीस काय वाटतेय तुला-सांग ना! अशी थरथरतेस कां 2 माझ्यापासून तुला मी आतां दूर जाऊं देणार नाही.

तारा-- ( लाडिकपणानें ) असं काय गडे ! कोणीतरी बघतील ना! मल! जाऊं द्या आतां. प्रेमाचा आरंभ असा घाईनं करणं बरं नव्हे. ( त्याच्यापासून, दूर होते. )

निळू-7( तिच्या जवळ जात ) पुन्हा भेटीचा लाभ कधी होणार

तारा--वरचेवर तूं इथं येऊं नकोस, आपल्या प्रीतीचा गाजावाज) इतक्यां- तच होणं इप्ट नाही. जरा धौरानं घेण्यांत दोघांचं कल्याण आहे. मी जातें आतां.

निळू--तूं सांगशील तसं मी करीन, मग झालं ना! तुझ्या गोड सोब- तीला माझा जीव भुक्रेलला असतो. तेव्हा जातां जातां एक गोडसा---( ती हसुना मान फिरवते. निळू पुढे होऊन तिला अडवितो. )

तारा--सोडा माझी वाट, सजणा निळू--आळख हो खुणगांठ, सजणी घु० ।।. तारा--फिराफरुनी कां यतां माग

मघुर मनाला हुरहुर लाग निळू--फार दिसांनी गांठ पड ही

रसरंगाची उसळ लाट ॥१॥ तारा--खुणाविश्ी हळु पुन्हा कशाला

काळवळहा नाहो तुजला निळु--रमवी मजला थाट तुझा हा

सांग किती ग! पाहू वाट ॥२॥ तारा--बावरली ही भाळी बाला

पुरे सख्या हा लबाड चाळा निळू--स्वप्न गुलाबी नयना फुलतां

हासत गगनीं गोड पहाट ॥३॥

अँकर रा ३९

( तारा मुरकत जाऊं लागते. निळू पुन्हा तिला धरतो तोंच काळू प्रवेश करतो. )

काळू--अरे चोरा, मला गुंगारा देऊन इथं गुंगत राहिलास काय ( निळू आणि तारा दोघेही दचकतात ) हीच तुझी महत्वाची कामगिरी वाटतं ! तुझ्या आचरटपणाची मजल बरीच दूर गेली, अरे, जनाची लाज नाही निदान मनाची तरी ठेव |! तुला काय वाटलं कीं मी आपला बोळ्याने दूध पितो

निळू-( चिडून ) तूं दूध पौ नाही तर ताक भुरक. माझा मी मुखत्यार आहे. माझ्या खासगी गोष्टींत तू आपलं तोंड घाळूं नकोस. मला तें मुळीच खपणार नाही. (तारेचा हात धरून) तूं काय करतोस तें मला बघायचं आहे.

काळू--तूं काय केलंस तें मी पाहिलं. आतां मी काय करतो तें तू पहा! ( चटकन्‌ तारेचा दुसरा हात पकडतो. )

निळू--काळ्या ! हिचा हात सोडून तूं सुकाट्यानं आधी दूर हो !

काळू-र्न[ रागानें ] निळ्या, बऱ्या बोलानं तूंच इथून दूर व्हावंस हें चांगलें !

निळू-ऱया गोष्टींचा परिणाम चांगला होगार नाही !

काळू--माझंहि तुला तंच सांगणं आहे.

निळू---( चवताळून ) मला सांगणारा तूं रे टेकोजी कोण हिने आप- खुषीनं दिलेला हात मी कधीच सोडणार नाही.

काळू-तिच्या गरीबपणाचा तूं फायदा घेत आहेस. खरं म्हटलं, तर तिचा हात धरण्याचा हक्‍क, तुझ्यापेक्षा मलाच जास्त पोचतो.

निळू--थांब, तुला चांगलाच हात दाखवतो. ( तारा दोघांच्या हातांना हिसडा देऊन दूर जाते. ते दोघे पन्हा तिच्या भोंवती उभे राहतात. )

तारा--( रागावून ) तुम्हीं हें दोघांनीं मांडलय तरी काय

४० पाहिला कांवि

काळू---तारे, तूं सुळोच भिऊ नको. तूं आपली माझ्याजवळ ये कशी ! ( तारा त्याच्याकडे जाते. ) हा निळ्या मोठा लबाड आहे.

निळू--हा काळ्याच मोठा कळगोटा आहे. तारे, तूं त्या चोराचं कांही ऐकूं नकोस, तूं आपली माझ्याजवळ ये पाहूं ! ( ती पुन्हा हसत त्याच्याकडं येते ) मी शेजारीं उभा असल्यावर या काळ्य़ाची भीड वरण्याचं तुला कारण

नाही.

तारा--तुमची हमरो तुमरी चालली आहे तोंवर मी कांहीच बोलत नाही.

निळू--तारे, तूं या काळतांडयाबरोबर बिलकूल बोळूं नको. त्याच्याकडं पुन्हा ढुंकून सुद्धा पाहूं नको. तूं माझ्याकडं पहा वरं एकदा.

कळू-निळ्या, तिल! असं सांगण्याचा तुला अधिकार नाही,

निळू--ही तारा माझी आहे.

काळू--वेड लागलंय तुला, मी तिला कधीच वचन देऊन चुकला आहे, तुला तं माहीत नाही. ही तारा तुझी नसून माझी आहे.

निळू--अगदीच हा आहेस झालं. तूं खूप वचनं देशील. पण तिन तुला तसं वचन दिलं नसणारच. (त्याला वेडावीत ) म्हणे ही तारा माझी आहे. तोंड आहे म्हणून बोळतोप झालं.

काळू-ऱ्द्राक्षं बघितलीं कों कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते---

* निळू--पग त्यांचा धनी वेगळाच असतो. मी तुला पुन्हा बजावून ठेवतो.

तुझ्या आधी या सुंदरीचा हात मौ आपल्या हातीं घेतला आणि माझं प्रेम पहिल्यांदा तिच्यावर बसलं आहे, आमच्या प्रेमांत तुझी लडवूड चालणार नाही!

काळू --जोपर्यंत तुझें आणि तिचं लग्न झालेलं नाही तोपर्यंत तिच्या- वरचं तुझं हें लादलेले प्रेम मला साफ कबूल नाहो. तुझा द्या पांचटपणा आतां जरा आवरता घे, तिचं खरं प्रेम तुझ्यावर नसून ते माझ्यावर जडलं आहे.

अंकररा ४१

निळू--( तारेकडे वळून ) तारके ! मी तुला एकदा माझी म्हटली आहे ना ! तुझं खरं प्रेम माझ्यावर आहे, असं याला अगदी सरळ सांग अन्‌ त्यांचे दांत त्याच्याच घशांत घाल,

काळू-ातारे ! मी तुला मनांतून माझी मानली आहे. तसं या निळ्याला एकदा निक्षून सांग म्हणजे त्याची दातखिळी बसलेल, वोळू, लवकर बोल ! तूं मला हवी आहेस,

निळू--तिच्यावर आपल्या खुषीची सकती तू लादूं नकोस. ही तारा मला हवीशी वाटते. ( तारेला उद्देशून ) आम्हां दोघांपेकीं कुणावर तुझे प्रेम आहे आतां अशी लाजू नकोस. हं, सांग काय तें लवकर !

तारा--( खट्याळपणाने पहात ) माझं प्रेम तुम्हां दोघांवर आहे. (हसते)

निळू--( निराश होऊन ) छे, हे प्रेम जरा विचित्र वाटतं. असा दोन्ही डगरीवर हात ठेवण्यांत अथ नाही. एका म्यानांत दोन तलवारी कशा राहतील ! तारे, तुझ्य़ा मनांत आहे तरी काय

काळू--एक घांस एकाच वेळीं दोन तोंडांत कसा जाणार ! अशानं हं कोडं सुटगार नाही. माझा तुला फिरून सवाल आहे. आम्हां दोघांतून तुला अधिक कोण आवडतो-मी कीं हा

तारा--( गंभीर मुद्रा करून ). प्रीतीला अशी जबरदस्ती खपत नसते. तुम्हां दोघेहि आपलंच घोडं पुढे दामटीत आहां. माझ्या मनाचा तुम्हीं कांही विचार केला आहे कां

निळू-ऱतुझं म्हणणं रास्त आहे. पुन्हा एकदा विचार करायला तुला सवड देतों.

काळू--आम्ही दोघे तुझ्या प्रीतीचे उमेदवार आहोंत.

तारा-<(रागावून) माझ्या प्रेमाचा तुम्हीं बाजार मांडला आहे, हें मला अगदी पसंत नाही. प्रेम हा काय पोरखळ आहे!

४२ पहिला कवि

निळ--नाही ! तरुण जीवांचा तो एक आवडता खळ आहे. तारे *खरंच तू रागावलीस ( काळूकडे वळून ) तू इथं आला नसतास तर फार बरं झाल असतं बघ !

काळू--तुलां तस वाटणारच. अरे, झाडावरच्या फळाला कुठलाहि पक्षी चालतो ! तुझ्या मूखपणान हें काम तूं बिघडवून टाकल॑ंस. ( तारेकडे पहात ) हें प्रकरण लांबणीवर टाकूं नये असे माझे स्पष्ट मत आहे. समज, हें आज तुझं स्वर्यंवर आहे. आम्ही दोघे तुला माळ घालण्य़ाला तयर आहोंत. अशी बिचकूं नकोस ! दोघांतून आपल्या पसंतीने एकाची निवड करण्याची पूण मुभा तुला दिली आहे. काय निळू ! या गोष्टीला तु कबूल आहेस नाई

निळू--कांही हरकत नाही. तसंच समक्ष झालेलं बरं ! मागाहून कुगी तक्रार करायची नाही.

काळू--तारे, आतां मार्ग घ्रेऊं नकोस. एकेक क्षण लाखाचा आहे. तुझ्य़ा मनाविरुद्ध आम्ही जाणार नाही.

तारा--( क्षणभर विचार करीत ) मी काय सांगत तें तुम्ही दोघेहि नीट ऐका ! तुम्ही दोघांनी आपापले डोळे अगदी घट्ट मिदून माझ्यासमोर स्वस्थ उभं राहायचं. ( ते दोघे तसें करतात. ) डोळा वर करून मधेंच तुम्ही बघायचं नाही. ( ते मानेनं आपली संमती देतात ) तुमच्या पेकीं ज्याच्यावर माझी मर्जी बसली असेल त्याचा हात धरून मी त्याला घेऊन जाइन. दुसर्‍्यानं कांही कुरकूर करतां दुसर्‍या मागगानं निमूट निघून ज,यच. ( काळू निळू एकदा तिच्याकडे नेतर परस्परांकडे रोखून पाहतात ). हं |! बोला लवकर, ही अट तुम्हांला कबूल आहे नसेल तर मी आपली जाते कशी |! मग बसा खुशाल गोंधळ घालीत. ( गेल्यासारखे करतें. )

काळू

| तुझी अट आम्हांला एकदम मान्य आहे. तझ्या इच्छेप्रमाणं होऊ दे. आतां वेळ लावूं नकोस. ( डोळे गच्च मिदून कांही हालचाल करतां दोघे उभे राहतात. तारा गालांतल्या गालांत हसते. )

अंकर रा ७३

तारा--थोडं सुद्धा हळूं नका कीं बघू नका ! तुमच्य़ा खरेपणाची आणि नशिबाची ही परीक्षा आहे. ( त्यांच्य़ाकडे निरखून पहात आगि पाय वाजवितां तिथून हलकेंच दूर जाते. ) तुम्ही अगदी तयार रद्दा ! मी सांगित- तल्या प्रमाणं वागण्यांत थोडी कतूर झाली तर तें मला खपायचं नाहो. (स्वनत) या चोरांना! असंच तोंडघश्लीं पाडल्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाहीत. ( उघड ) डोळ्याचं पातं थोडं सुद्धा हलवू नका. मी आत्ता आलेंच हं! ( तेथून एकदम पसार होते. ते दोघे डोळे मिटून तसेच उभे असतात. )

निळू--( काळूला हळूच चिमटा काढीत ) काळू ! तूं सावयव आहेस का घेतलीस समाधी !

काळू--( त्याचा हात ढकलून ) शः, लका मोठ्यानं बोळूं नकोस. तूं अगदीच खुळा आहेस. जरा धीर धर. आपणाला सोडून ती कांही कुठं पळून जात नाही,

निळू---( हलक्या आवाजांत ) तसं नव्हे रे! कान ताणून जरा कानोसा. चे. तिची चाहूल कशी लागत नाही ! ( त्याला पुन्हा चिमटतो. )

काळू--निळ्या, चिमटे काय काढतोस आणखी थोडी कळ सोस. तिच्या मनाचा अजून निश्‍चय झाला नसेल, कारण हें काम थोडं बिकट आहे. तूं जरा गप्प बसायला काय घेशील १? अशानं ती बिचकेल ना ! गिरक्या घेऊन. खालीं उतरणार्‍या कबूतराला मधंच खडा मारला तर ते उडून जातं.

निळू---काळू, मला हें लक्षण कांही ठौक दिसत नाही. अरे, डोळे झाकून कां कुठे असलीं कामं होतात ? तूं कांहीहि म्हण, तिन आपल्या डोळ्यांत धूळ टाकली हें खास ! ( दोघे कांही वेळ तसेच मिटल्या डोळ्यांनी तिची वाट पाह- तात, नंतर निळू काळूचा हात धरून त्याला ओढतो. काळूहि त्याला तसा ओढत नेऊं लागतो. ) अरे, मला कुठं ओढून नेतोस तुला दिसत नाही का! म्हटलं: मी निळू आहे--तारा नव्हे !

काळू--/ डोळे उघडून ) आं, हें फुलपाखरू गेलं तरी कुठ:

७० पहिला कवि

निळू--मी काय सांगूं यांत तुझाच कांहीतरी काळा कावा असला पाहिज. डोळे झाकण्याच्या आधी तूंच तिला खुगावून बिथरून ठेवली असावीस.

काळू--माझे लक्ष नाही असं पाहून तूंच तिला कांही कानमंत्र दिला असावास. त्या शिवाय का ती अशी विजच्या चपळाईनं डोळ्याआड झाली

निळू--दोन मांजरांनी एकाच लोण्याच्या गोळ्यावर डोळा ठेवला कों हें असेच व्हायचं, तुला या ठिकाणीं यायळा कुणी सांगितलं होतं

काळू-र्‍प्रेम करायचा मकता देवानं तुला एकय्रयाळांच दिलेला नाही. मलाहि मन आहे. ती मलाच निवडगार होती.

निळू- तू. मदनाचा पुतळाच कों नाही !

काळू--आणि तू अगदी राजबिंडा तरुगच ! काय ध्यान आहे पग | आरतीच करायला कोगी नाही. आपलं नाक कापून मला मात्र अपराकुन केलास ! ती तशीच निघून गेली, याल। कारग तूंच आहेस. नाही तुला, नाही मला आगि घाल कुत्र्याला !

निळू-ाकाळू, मी तुला एकत्रार बजावून ठेवतो. तूं जर पुन्हा तिच्य! वाटेला गेलास तर तुझा काटा मी काढून टाकीन.

काळू--( डोळे पिंजारून ) तिळा फितवून वरती मला दम देतोस कोय ही जागा माझी आहे, आगि ती मलाच मिळाली पाहिजे तुझा अज तू दुसरीकडं टाक !

, निळू--< संतापून ) तुला ती कशी मिळते हें मी पाहणार आहे. तुझ्या

प्रेमाची निवडणूक तूं आणखी कुठं तरी आपल्या सोयीप्रमाणं लढव !

काळू--निळ्या, हें चांगलं नव्हे हं! याचा वचपा काढल्याशिवाय मी राहणार नाही. याद राखून रहा !

निळू--जा ! मी असले छप्पन्न बघितलेत. मीहि मेलेल्या आईचं दूध प्यायली नाही, ( एकमेकाकडे रागाने पहात विरुद्ध दिशेने निघून जातात. )

प्रवेश दुसरा

( स्थळ--वाल्याची झोपडी, अंगणांत त्याची बायको हिरा कांहीतरी काम करीत असत. जवळच एक रिकामी घागर पडली आहे. )

हिरा--दुपार होत आली तरी यांचा अजन पत्ता नाही. आज पाडवा- सणाचा दिवस, पग घरांत धान्याचा एक कण दिखील नाही. जनांत आग मनात आग, अशी स्थिती कसला हा आमचा संसार अन्‌ कसलं हे जगगं ! दुःखाचा कडू काढा पीत आलला दिवस कसातरी ढकलायचा. कुठं कुठं म्हणून समाधान मानायला जांगा नाही असं झालं तर काम करायला हात तरी कसा उचलल ! पग मौ सांगायचं कृुगाला १? आपलेच दांत नि आपलेच ओठ ! ( घागर उचलन घेत. )

(५) जाऊं कशा मो जलभरणा ! पाझरतां नयना धारा वाढे उरो वेदना घ० गारबांचा करुण कहाणा नच जात जगाच्या काना माळ नाहो जीवना १॥ संसारा र्‍या शेजारा जन्माचे हातो वरी विफल सुखाचा कल्पना ॥२॥ ( खिन्नपणाने सभोंवा( पाहून चाळू लागते. मागून वाल्याकोळी जड पावलांनी यतो. ) वाल्या--अग हदिरू ! तशीच मागं ये बघू ! तुझ्याकडं माझं जरासं काम आहे.

टे पाहला कावे

हिरा---( तिथूनच मागे वळून ) कां हाक मारलीत मला ? फावल वारतं तुम्हांला आतां यायला ! ( फगकाऱ्याने ) मला थांबायला वेळ नाही. ( तशीच पुढें जाऊं लागते. )

वाल्या---इतक्य़ांत दिवस कांही बुडत नाही अन्‌ झराहि आटून जात नाही. तोंडाचा चंबू करून तिथंच काय बघत उभी राहिलीस मला तुझ्याशी थोडंच पग जरूरीचं बोलायचं आहे. अग, अशी इकडे तरी ये !

हिरा---( त्रासिक मुद्रेने जवळ येऊन ) मी तुमच्याशी अशी बोलत राहिले तर घरांतल्या कामाचा डोंगर कोण उचलील

वाल्या--उगीच आवळ्याचा भोंपळा करूं नकोस. ती घागर आधी खालीं ठेव बघूं ! ( घागर काढून घेतो.)

हिरा--तुमच्या मनांत आज आहे तरी काय £ ही काय गोष्टी सांगायची वेळ आहे असे दिवसाउजेडीं घरापुढ॑ आपण बोलत उभे राहिलों तर लोक

यर म्हणतील---

वाल्या--नवऱ्याला आपल्या बायकोशी बोलायला कां कुगाची चोरी आहे ? माझ्या समोर अशी उभी रहा. लोक काय म्हणतील याचा विचार नंतर करूं. मी काय म्हणतो तें जरा आधी नीट ऐकून घे !

हिरा--आज पावतर तुमचं थोडं का ऐकून घेतलं, पण रोजच्या रडींत काथ खळ पडली असल तर शपथ ! ' ये रे माझ्या मागल्या अन्‌ करण्या भाकरी चांगल्या !--तदांतली गत. कधी मनाजोगता दागिना नाही कों होसेसारखं लुगडं नाहो. मेल, माणसानं किती म्हणून सोसायचं ! (मान वळवून पदरान डोळे टिपते.)

वाल्या--( खिन्नपणानं ) तुझं आपले सदान्‌ कदा असंच. चेहर्‍याला कायमची सुरकुती पडलेली, बायकोची मर्जी राखगं ब्रह्मदेवाच्या बापालाहि जमायचं नाही. स्त्रीच मन म्हणजे अळवावरचं पाणी ! क्षणभर काय चमकेल तेवढंच. एकंदरींत नवर्‍याचा जन्म अगदी वाईंट--

अंक२रा ७9७

हिरा--अन बायकोचा काय चांगला !

चाल्या--नवऱ्याच्या नाकांत वेसग घालून त्याला वाटेल तसं नाचायला मिळतं !

हिरा--(वाईर तोंड करून) असं उगंदुणं बोळून मला हिणविण्यासाठी कां इकडे घाव घेतली ! आणि हें काय->रिकाम्य़ा हातानं माघारी कसे आलांत ? आज पाडव्याचा दिवस. घरांत चिमूटभरसुद्धां धान्य नाही. हे दिवस तर किती कठीग अन्‌ त्यांत तुमचा हा असा अवतार !

(६) झुर जीव भाळा, माझा घरांत भरला खरा उन्हाळा घ० वणवण कारेतां दिणली काया गमली वांया अवधा माया कां मग मजला छळितां राया ! पुर करा हा चाळा १॥

वाल्या--ए बये, जरा शांत हो तुझी वीज अशी कडाडू लागली कीं माझ्या छातींत धडको भरंत. तझ्या या गडगडारांत मुख्य मुद्दाच मी विसरून गला.

हिरा -तुम्हांला मी आपली गरीब गागयर सांपडलें. काय' कराल अन्‌ काय बोलाल तेवढं थोडंच आहे.

वाल्या--! मनाशी निश्‍चय करून ) आतां जास्ती भीड धरून सोय नाही. मी तुला स्पष्टच विचारतो.

हिरालटकाय

वाल्या -तुमचा सांभाळ करण्याकरितां आतांप्येत मौ अनेक भलींबुरी कृत्य केलो. कित्येक निरपराध जीवांची हत्त्या करून पापांचे रांजण

४८ पाहिला कावि

रचून ठेवले, या तुमच्यासाठी म्हणून साठविलेल्या पातकांत तुझी पाती असेलच. कारण पत्नि ही पतीची जन्माची मेत्रीग असते !

हिरा--मेत्रीण म्हणजे कांही गुन्हेगारीग नव्हे !

वाल्या---पग त. माझी खरी बायको आहेस, हो गोष्ट तर खोटी नाही ना ! माझी बायको म्हणून प्रत्यक बाबतींत मला हात दगं हें तुझ पवित्र कतेव्य आहे.

हिरा --( निर्भीडपगांने ) हवा तसा वळवायला माझा हात कांही मी तमच्या हातीं दिला नाही. तुम्हीं बाहेर जीं कम केलीत, त्याची आगाऊ पर- वानगी माझ्याकडून तुम्ही कवी मिळविली होती का! भग आतांच माझी साक्ष काढण्यांच कारण काय £ बायको म्हणज तुम्हांला काय केरसुगी वाटली होय !

वाल्या--( उदास होऊन ) एकूण तुझ खरं स्वरूप आज बाहेर पडलं अन्‌ तें एका अर्था बरंहि झालं. हिरा समजून हृदयाशीं धरला पग ती अखर गारगोटी ठरली. इतके दिवस तुमच्याकरतां माझ्या जिवाचे मी रात केलं वाटेल ते करर सोपून तुमचा चरिताथ चालविला. त्याचा मोबदला अशा तऱ्हेनं मिळेल, ही कऱ्पना मला आली नव्हती. माझ्या पार्णांत तुझा वाटा आहे, ही गोष्ट तुला कबूल नाही

हिरा--ज्याच्या तो आपल्या कमाला जवाबदार असतो. आपला काळा हात दुसऱ्याच्या कपाळीं मारण्यांत अथ काय ?

वाल्या--मी इतका वेळ फत्तरापुढं टाहो फोडला म्हणावय'चा, प्रत्यक्ष तूं माझी अर्धांगी, पण तुझ्या या कठोर बोलण्यानं मळा अधांगाचा झरका आला आहे. माझंच घर माझ्यावर फिरल्यावर हें काळ तोंड मी कुगाला दाखवू ! ( दुःखानं तोंड फिरवतो. )

हिरा --दुसऱ्यांचे गळे कापा--दरोडे घाला अन्‌ आपलं घर चालवा, असं तुम्हाला मी कधीच सांगितले नव्हतं. जें काय आगून द्याल त्यांत समा-

अंक२रा ७४९

धान मानून--कोंडयाचा मांडा करून--हा संसाराचा रथ तुमच्याबरोबर मी ओढीत राहिले आहे. निष्कारण इतर उठांठेवींत पडण्याची मला गरज काय, आगि यापूर्वी ती तुम्हांला कधी भासली होती का ! मग आतां ही धावपळ कशाला !

वाल्या--माझ्या काळजींत तूं आणखी नवी भर घातलीस. दमून भागून जरा गार सावलींत बसायला म्हणून जावं तोंच वरून झाडाची फांदी मोडून डोक्यांत पडावी, तसं झालं. मला कांही सुचेनासं झालं आहे. माझी दया तुला येत नाही कां

हिरा--अगदी हंडाभर दया येते, पग उपयोग कापर कुक्करू बाळाप्रमाग तुम्हांला कडेवर घेऊन कां मिरवू

वाल्या-र्‍हेंच कां तुला तुझ्य़ा पती विषयीं प्रेम वाटतं

हिरा --प्रेम वाटतं म्हणून तर तुमच्या मागने अशी फरफरत राहिल आहे. नाहीतर केव्हांच जोगीग झालें असतें. केवळ प्रेमाच्या गोड शब्दांनी संसार गोड होत नाही. प्रीतीनं मनाची होस भागेल पण पोटांतली आग तिने निवत नाही. प्रेमाबरोबर प्रपेचांत पैशाचीहि सोबत पाहिज. पग तिच्या नांवाने आमच्या घरांत आवळ्याएवढं पूज्य ! जगाच्या रुक्ष व्यवहारांत प्रीतीचे कोवळे पंख गळून पडतात. मागसाजवळ समाधानाचं निलंप साधन असल तरच जगण्यांत खरी मौज ! इतके दिवस पोडांत उसळणारे उमाळे मी ओठाबाहेर पडू दिले नाहीत. तोंड दाबून हा वुकक्‍्क्याचा मार सहन केला. पग आज वेळ आली म्हणून त्याचा उच्चार केला.

वाल्या--माझोंच बोटं तूं माझ्या डोळप्रांत घातलीस. तुझ्या म्हगण्यांत बराच सत्यांश आहे. मौपगाच्या धुंदीत मी भलत्या वाटेला लागलों आणि जगाच्या निंदेचा मानकरी झालों. त्या लाजेनं बाहेर तोंड काढायला मला जागा नाही.

गड

७० पाहिला कावे

हिरा-_असे भागुबाई सारखे इथ विवळत काय बसलात | जा, कांहीतरी मिळवून आगा. बायका पोरांचं पोट भरतां येत नव्हतं तर हा फास माझ्या गळ्याला कशाला लावलांत ( तोंडाला पदर लावून हुंदके देऊं लागते. )

वाल्या--खरी चूक माझी आहे. मीच मूर्ख त्याला तूं तरी काय करणार ! स्वतांच्या हातांनी मी आपल्य़ा तोंडाला काळं फासून घेतलं. हें पातकाचं ओझ मी आतां कुठं लपवून ठवूं ! माझं म्हणणं तुला पर्संत नाही असंच ना

हिरा--( निश्चयात्मक वृत्तीने ) हो, अगदी तस्सेच ! पतीच्या अर्ध्या पुण्याची मालकीण पत्नि असते, पग पत्नीच्या अध्या पापाचा धनी पती असतो-- असं शास्त्र सांगतं, ज्याने करावं; त्यानं भरावं ! (वाल्या दोन्ही हातांनी आपले तोंड झाकतो. ) असेच बसा डोकं घरून आगि बघा त्यांत काय प्रकाश पडतो का---, घागर घेऊन फणकाऱ्यानं निघून जाते. )

वाल्या--( उद्गेगाने ) बायको म्हणज सोन्याची सुरी. हाय रे दैवा ! काय ही माझी दुदशशा ! या कठोर जगांत कोणी कोणाचा नाही--सारा| मायेचा बाजार. कसला हा संसार ! जीवन हें एक अफाट अन्‌ रखरखीत वाळवंट आहे. तहानेनं व्याकूळ झालेल्या हरिणानं मृगजळाच्या मार्ग लागून ऊर फुरेपर्यंत पळत सुटावं आणि शेवटीं निराशेच्या बाणानं घागळ होऊन वासून पडावं. जिथं शेजेची बाईल उलटून पडायला मागं पुढं पहात नाही, तिथ इतरांची गोष्ट कशाला ! आपला भोग आपगच भोगला पाहिज, त्या शिवाय दुसरा इलाज नाही.

( त्याचा मुलगा बहिरू आपल्याच नादांत रंगून गांग म्हणत येतो. )

(७) बहिरू--आला दिन हा सोन्याचा मोद बहरला बालमनाचा घ०

नाचत नाद गुढी पाडवा त्या नवलाचा वाजे पावा खुगेध भरला मधुर फुलांचा १॥

अंक ९रा पर्शै

नटली दुनिया नवरंगांनी छानदार लवुनि लणी च. २९. €*> पुरवा प्रेम छद जिवाचा ॥२॥ ( गागें म्हणून झाल्यावर बापाचा उदास चेहरा पाहून तो चपापतो. ) बाबा, तुम्ही एकटे असे इथं उभे कां कुगाची वाट बघताय

वाल्या--( त्राग्याने ) बघतोय आपल्या कमांची वाट! तुझा पिंगा जरा बैंद कर. चंडोलागत असा ताना मारीत कुठं निघालास

बहिरू--मी मघांपासून तुम्हांलाच शोधीत आहे. बाबा ! आज पाडवा आहे. मला सुंदर नवा पोषाख आणतां ना ! हे गबाळ कपंडे घालून माझ्या मित्रांत वावरतांना मला फार लाज वाटते. मी आईला विचारलं तर ती म्हणाली बाबांना विचार म्हणून--

वाल्या--तुम्ही दोघं मायलेकरं मिळून अयोध्येच्या बाजारांत नेऊन मला विका आणि आपल्या जिवाची होस फेडून घ्या. माझ्या आयुष्याची गुढ्यातोरणं कोसळून खालीं पडत असतांना तुम्हाला सगाचे सोहाळे सुचताहेत.

बहिरू--( फुरंगटऱून ) शेजाऱ्या पाजाऱर्‍्यांचीं मुले नऱून थरून मिरवत आहेत आणि आम्हीं आपलं चिमणी एवढ तोंड करून कोपऱ्यांत बसून रहावं , मग आणतां ना मला नवा पोषाख

वाल्या---( गहिवरून ) बहिरू, आपण गरीब माणसं आहोत. सुखाच्या छायेत श्रीमंतांनी हसाव आणि गरीबांनीं दुःखाच्या उन्हांत तळमळत रहावं ! असा या दुनियेचा कायदा आहे.

बहिरू--ते कांही मला माहीत नाही. तुम्ही होय म्हटल्याशिवाय मी इथून मुळीच हलणार नाही. ( स्सतो. )

वाल्ग्रा--!( त्याला जवळ घेऊन ) असं करूं नये बाळ ! तुला सवे गोष्टी कळायला हव्यात. तूं आतां मोठा झालास--

ष्र पाहिला कवि बहिरू--अं हं, आई म्हणते की माझा बाळ अजून लहानच आहे.

वाल्या--( त्याच्यापासून दूर होत ) तिन तुला फारच शेफारून ठेवलाय फाजील लाडानं मुलं बिघडतात हें खोटं नाही!

बहिरू--हं हो काय बाबा ! तुम्ही नेहमी आम्हांला असं हिडीस फिडीस करतां. मायेची माणसं जर अशीं ढकळून देऊं लागलीं तर आम्ही पोरांनी कुणाच्या तोंडाकडं बघावं

वाल्या--मुला, असा एकाद्या खुळ्यासारखा वागूं नको. जरा शहाणा हो?

बहिरू-( गाल फुगवून ) असं हो काय म्हणतां१ मी खुळा आहे कां हो बाबा !

वाल्या--नाही, फार शहागा आहेस. तुझा हा हट्ट अन्‌ ही वटवट आतां पुरे कर!

बहिरू--मी आपला जातोच कसा--( जाऊं लागतो. )

वाल्या--थांब जरा ! असा तुरतुर करीत कुठं निघालास? मी तुला एक इन विचारतो. त्याचं उत्तर चटकन्‌ दे पाहूं ! चांगला मुलगा आपल्या आई- बापांची इच्छा कधीच मोडत नसतो.

बहिरू---एकच कां, दहा प्रश्‍न विचारा कीं ! उत्तराला हो काय तोटा

वाल्या--तुमच्या रक्षणासाठी म्हणून माझ्मा हातून अमाप पाप घडलं आहे. माझा मुलगा या नात्यानं त्यांतला तुझ्या वाणीचा हिस्सा तूं उचलणं जरूर आहे.

बहिरू--( कानांवर हात ठेवून ) त्यांतलं मला कांही सुद्धा समजत नाही. एकादा गोड जिन्नस किंवा आवडीची वस्तु आणून द्यायचं बाजूलाच राहिलं आणि म्हणे पाप घेतोस कां ? कांहीतरी वेडयागत बडबडताय झालं !

अंक२ररा ५३

वाल्या--छान ! माझे पाय तूं माइय़ाच गळ्यांत घातलेत. पोटच्या पोरानं आपल्या बापाला वेडा म्हणावं यापेक्षां आगखी दुंदेव तें कोणतं तूं माझं ऐकत नाहीस---

बहिरू--तुम्ही कुठं माझं ऐकतां म्हणून मी तुमचं ऐकावं ! तुमचे पाप म्हणजे कांही गोंडयाची टोपी नव्हे--आपली ठेवली डोक्यावर अन्‌ निघाला एंरींत ! बसा आपल्या पापाचा हिशेब करीत. माझ्या खेळगड्यांना मला भेटायला जायचंय. काय पाप, काय बाप-सारा न्याराच कारभार ! ( घाईने निघून जातो. )

वाल्या--अरे बहिरिटा, आपल्या जन्मदात्याला असा संकरांत लोटून जाऊं नकोस ! गेला कारटा-आतां कुठला परत यायला, हा मुलगा नसून मारगंच्या जन्मींचा सूड आहे. चोराचा पोर साव कसा निपजणार ! विषवृक्षाळा अमताचीं फळे कुठून येणार £ ही विटंबना माझ्यानं सहन करवत नाही. माझं भेसूर दुदेव माझ्या डोळ्यांसमोर कसं थयथय नाचत आहे. ज्यांची मी हत्त्या केली ते सारे जीव अक्राळ विक्राळ रूपं धारण करून मला भेडसावीत आहेत. ( जमीनीकडे पहात ) पायाखाळची जमीन दुभंगून जात असल्याचा मला भास होत आहे. हें सारं जग माझ्याभोवती गरगर फिरू लागलंय. खुनी वाल्या, पापी वाल्या ? अशा ककेश आरोळ्या माझ्या कानांवर आदळत आहेत. ( कान झाकतो. क्षण- भराभें आपल्या हातांकडे पहातो. ) हे माझे हात कपे रक्‍तानं रंगून गेलेत. त्यांना स्वच्छ करायला सात सागरही अपुरे पडतील ! केवढा मी हतभागी अन्‌ अघोर प्राणी ! कुठं जाऊं, काय करू ! कोणीच कां माझं नाही१ (“या जगांत कोणी कुणाचा नाही, अस गंभीर शब्द पडद्यामागून ऐकूं येतात. तारवटलेल्या डोळ्यांनीं वाल्या सर्भोवार पह्यातो ) काय, कोणी कुणाचा नाही! खरंच, या मायावी दुनिर्येत कोण कुणाचा आहे;

(८) नाही काण कुणाचा ! मना किसना नेम कशाचा घू०

"8 पाहिला कवि

दो दिवसाची येथिळ वसती मू्तिसवे त्या ढळती ज्याती कठिण गती दुबळ्यांची जगती साद घुमे करुणेचा १॥

प्राति जिवाला ठावित चटका

परि पाक्यांतुन होत सुटका

खेळ कसा हा चाळे लटका ठेवा दूर सखाचा ॥२॥

( त्याचा मित्र काळू प्रवेश करतो. )

काळू--( त्याच्याकडे निरखून पहात ) वालोजी, असा उदास कां झालास ! अरे, असं कपाळ बडवून घेण्यासारखं झालंय तरी काय तूं हें काय आरंभल आहेस--

वाल्या--इथं उगवायला तुला आतांच फावलं वाटतं ! फुकट कटकर करून माझं तापलं माथं आणखी भडकवूं नकोस.

काळू--अरे, पण तुला असं तापायला काय झालंय तें तरी सांगशील कों नाही ! कसल्या संकटांत सापडला आहेस--हा प्रकार आहे तरी काय

वाल्या--( स्वगत ) नात्यांचे नाजुक धागे केव्हाच तुटून गेले. अशा- वेळीं खरा, स्नेही कदाचित्‌ उपय्रोगी पडण्याचा संभव आहे. हा आयता आलाच आहे. तेव्हा यालाहि सुनावून पहावं, [ उघड ] काळोजी, एका काळजीनं मी हेराण झालो आहे. तुझाच काय तो आधार मला उरला आहे,

काळू--तुला मदत करायला मी केव्हाहि तयार आहे. नाहीतर मी तुझा मित्र कसला ! |

वाल्या--आजवर अनेक बऱ्या वाईट कामांत तूं सला साथ दिलीस, सुखदुःखांचे कित्येक उन्हाळे पावसाळे एकमेकांच्या संगतींत आपण घालविले:

अकरा "रू

आणि आपल्या मेत्रोंत कधी खड पडूं दिला नाही. कक प्रवाशांच्या मुंडया मुर- गळण्याच्या कटांत तूं माझ्या.हाताला आपला हात लावलास, जितक्या उत्साहानं लुटीचा वांटा उचलीत आलास तितक्‍याच आनंदानं त्या घडलेल्या पातकांतला आपला भाग तूं आपल्या शिरावर घ्यायला यावेळीं सरसावलं पाहिजेस.

काळू--तुझी ही पापपृण्याची पोथी जरा गुंडाळून ठेव. मी आधींच स्वतांच्य़ा ओझ्याखालीं चंगरून गेलोय. त्यांत तुझ्या बोजाची जादाभर पडली कीं मी जमीनदोस्त होईन --

वोल्या--माझा सवाल तुला कबूल नाही |

काळू--माफ कर ! कुत्र्यांचे पाय मांजराला चिकटविण्यांत काय अथे ? हवं तर दुसरं आगखी कसलंही काम सांग. त्यांत जर मी मागं सरला तर माझे नांव बदलून ठेव.

वाल्या--शेवटीं तूंहि मला दगा दिलास. घर फिरल्यावर घराचे वासे फिरल्यास नवल तें काय £ जिवाभावाचा मेतर म्हणून मी तुझ्यापुढे तोंड वेंगांडलं पण तूं मला चांगलीच ठेवून दिलीस. माझेच नशीब फुटकं--दुसरं काय़ ( जाण्यासाठी वळतो. )

काळू--एवढय़ा तेवढया गोष्टीचा बाऊ करण्याची तुला खोडच आहे. उभा रहा ! अशी डोक्यांत राख घालून कुठं चाललात

वाल्या--( परतून ) डोक्यांतच नव्हे तर साऱ्या अंगाला राख फासणार आहे.

काळू-हें राखेचं वेड तुल कोणी लावलं

वाल्या---ज्या आशेवर जिवाने जगांत जगायचं तिचीच राखरांगोळी झाल्याबर वेडाशिवाय. दुसरं क्राय शित्लक उरणार !

काळू---शहाण्याप्रमाण॑ चांगला बोलतो सवरतो आहेस, आणि म्हणे मी वेडा. हें तुझ वेड निराळे दिसतेय. मात्र असं वेड पांघरून. पेडगांवला जागं बरं नव्हे.

» हि. “२ ८) “७ /%

ष्ट पाहिला कावे

वाल्या--काळू, मला खरंच मोठे वेड लागलंय. माझ्या अंतःकरणांत

एकच भडका उडून गेलाय, हें चोराचिलटाचं लाजिरवाणं जिंग आतां परं झालं !

काळू--साप समजून तूं उगाच भई धोपटत आहेस. आपण कोण याचा आधी नीट कानोसा घे. भलती कल्पना उराशीं बाळगून फशीं पडतील. घड हा लोक नाही अन्‌ तोहि लोक नाही--

वाल्या--या दुरंगी दुनियेचा मला पुरेपूर वीट आलाय. एकद हें विष आहे, हें कळून आल्यावर पुन्हा तेंच चाटत बसणें, हा मूखपणा नव्हे का ! माझे डोळे आज.साफ उघडले--माझा मार्ग मोकळा झाला.

काळू--ही शुद्ध तुझी फसवणूक आहे. गरीवानं ठराविक चाकोरी सोडून जाणं धोक्याचं असतं.

वाल्या--जुनी वाट चकीची ठरल्यावर नवीन वाट कां पाडू नये

काळू--पाखरं हवेत उडतात म्हणून माशानं पाण्याबाहेर उडी घेऊन चालेल का! कांही तरी करायला जाशील आणि आपलं हसं मात्र करून घेशील. क्षरे, कुठही गेलं तरी पळसाला तीनच पानं |

वाल्या--जग ज्याची पवी करीत नाही, त्यानं जगाची तरी पवा कां

करानी £ या नीरस संसारांत एकमेकांना वाटणारी आपुलकी म्हणजे सकाळचं

भुक--दिवस वर्‌ -येतांच ते वितळून जातं. जगांत प्राणी ह्या एकटा येतो

आणि एकटाच निघून जातो. तू आपला रस्ता सुधार. माझं मी पाहून घेईन. ( जाऊं लागतो. )

काळू--( त्याळा अडबून ) पण तूं जाणार कुठं भनू करणार काय

वाल्या--पाय नेतीक तीः वाट अन्‌ कामं होईल तो थाट ! अंतरीचा जागा झालेला परभेश्‍वर हाय यापुढ माझा संखासोसरी, मी आतां कुणाचा माही अमू माहेंही कुणी नाही !

अक रा पप

काळू---असं माणसांतने उठून जाणं बरं नव्हे. पोकळ वैराग्य अखरीस तुला गोता देईल. मारे एकाद्या संताचा आव आगून तूं तरंगत चालला आहेस, पण “' अग अग म्हशी, मला कां नेशी असं म्हणत पुन्हा लोळण घेत परत येशील, अरे, जरा विचार कर. का आपली उचलली जीभ अन्‌ लावली टाळ्याला !

वाल्या--माझा निश्‍चय आतां बदलणं शक्‍य नाही. माझ्यापुढून तूं चालता हो ! एक क्षणभरही मो इथं थांबणार नाही.

काळू--कुठलीही गोष्ट अशी तडकाफडकी साधत नसते. पी हळद कों हो गोरी ? असं करून चालणार नाही, तूं निघालास पण तुझ्या बायकापोरांची काय वाट

वाल्या--जो तो आपल्या नशिबाचा ! कसलाच पाश मला गुंतवून ठेऊ शकणार नाही, पंख फुटलल्या पाखराला घरटं अपर पडत !

काळू--कानांत वारं शिरलेल्या वासरागत असा मोकाट कां सुटळा आहेस ? तूं आमच्या टोळीचा नायक, खांब कोसळल्यावर छप्पर कसं टिकेल !

वाल्या--.बेफिकोरपणाने) आभाळ ढासळलं तरी माझं पाऊल मो माग घेणार नाही. तुमचा गाडा तुम्ही खुशाल हाकीत बसा !

काळू---पण तुला जाऊ देणं मला परवडणार नाही. एका फटकाऱ्याने इतक्या दिवसाच्या मेत्रीची गांठ तुटेल का ! आणि तूं निघून गेल्यावर आमची स्थिती सुकाणू तुटलेल्या नावेसारखी होइल,

बाल्या--ती नाव फुटली तरी मला त्याची खातर नाही, माझ्या प्रेमा फेक्षां तुमचा स्वाथेच तुम्हांला अधिक प्यारा आहे. काळू ! माद्या मानलेष्क *जिवळूग मित्र म्हणून ह्या अखेरचा एक राब्द तरी ऐक ! ठूटमारीचा द्दा किळसवाणा थंदा यापुढे तूं पण सोडून दे. माणसान माणसांचे मळे काप, हें. ययांगळ आहे का ; बरं, नमस्कार | मी येतो आतां !

पद पहिला कवि

काळ--तूं खूप जाशील, पग मी तुला सोडला पाहिज न! तूं डोळे मिटलेस म्हणन मी स्वस्थ रहायचा नाही

वाल्या--( आवेशानं ) माझ्या कामांत नसती ठडवूड करतां नीट निघून जा ! नाहीतर या कुऱ्हाडीचा हा शेवटचा घाव तुझ्य़ा मस्तकांत घालून त्या ताज्या रक्‍तानं आजवरच्या पापाला तिलांजली देईन. प्रत्यक्ष काळहि आतां मला परतवायला समथ होणार नाही. ( कुऱ्हाड उगारून ) दूर होतोस कीं-- ( काळू घाबरून दूर होतो. )

काळू--तुझ्या हातून मरायला माझा जीव कांही इतका वर आला नाही. जा, अगदी खु्लाल जा ! कुठल्याहि कड्यावरून खाली उडी घे अन्‌ थेट स्वगोत जा, तुला मी बिलकूल अडथळा करणार नाही. मूत्यूची छाया पडलेल्या रोग्याला औषध नकोसं होतं. जा ! तुझं कमे तुझ्याबरोबर ! ( बाजूला होतो. )

वाल्या--माझ्या छातीवरचा भार दूर झाल्याचा आनंद मला होत आहे. आतां मी आणि माझा परमेश्‍वर ! ( हातांतल्या कुऱ्हाडीकडे पहात ) ही कुऱ्हाड---निरुपद्रवी जीवांच्या कत्तलीची जळती निश्याणी--हिची सोबत आतां इथंच संपवावी. ( कुऱ्हाड फेकून देतो. )

(२)

असार हा संसार, खरोखर स्वाथ पसारा घातक सारा मायेचा बाजार ध०

निशिदिन शिणला जीव बिचारा

अवचित वितळ रम्य मनारा

ताप रिकामा यत कामा. प्रेमाचा परिवार ॥। १.॥

अंक२रा "५९

रानांतिल या फळ विषारी

साधिल दावा क्रूर शिकारी

येथलि जा रे दूर पाखरा ! आग भरे अनिवार २॥

नवा प्रकाश माझ्या हृदयांत डोकावत आहे. या शुभ घटकेला आपल्या. नव्या आयुष्याला सुरवात करावी. ( निघून जातो. काळू पुढें येतो. )

काळू-( त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात ) ही अवदसा या मूर्खाला कुठून आठवली कोण जागे ! सारी ह्यात चोऱ्यामाऱ्या करण्यांत खचे झाली आणि उतार वग्नांत उपरति झाली. कहुन करून भागली अन्‌ देवपुजेला लागली ! शेंदूर लिंपून कां कुठं दगडाचा खरा देव होतो ? कुठल्या- तरी झाडाखालीं वारा पाणी खात टाळ कुटत बसेल झालें--दुसर॑ काय £ ऐका हो ऐका |! वाल्या कोळी वेडा झाला, वाल्या फुकट गेला |! (जातो. )

प्रवेश [तिसरा ( स्थळ--अरण्य, काळूला शोधीत तारा येते )

तारा--असल्या दाट जंगलांत काळूला कुठं म्हणून शोधायचा ! घाईनं येतांना मधच मी वाट तर चकली नसेन ना! ' धरलं तर चावतं अन्‌ सोडलं तर पळतं, ' अशी माझी अवस्था झाली आहे. प्रीतीची वाट इतकी वेडी वाकडी अतते कां £ तो निळ्या तसा अन्‌ हा क'ळ्या असा ! कुणाचा म्हणून भरंवसा धरतां येत नाही. पण यांतून मागे काढल्याशिवाय माझा. निभाव लागायचा नाही. एकदा काळूला गांठून सारा खुलासा करून घ्यावा म्हणून मी धडपडत आहे, पग हा कुठं काळ करून उसलाय तें देव जाणे ! मांडवावरनं घसरलेली वेळ जवळच्या झाडाचा आश्रय घेते. निराश मनाली नवी भाशा पून्हा टवटवी आगते--

६० पहिला काव

(१०) रंग नवा रमवी नयनां मिळल कां ते प्रेम मना घ० सखा जिवाचा जगा असावा भदभाव अवघा जावा ॥१॥

टकमक बघतां मोहक तारा मघ निळा गगना आला सहजच रुसला चंद्र लाजरा नाद निराळा दुमदुमला ॥२॥ गातां राना मंजुळ गाणी ब्याकुळ झाली फुलराणी कोण सोाडविल माझ कोडं गोड जिवाला वेड जडे ॥३॥ ( काळू प्रवेश करतो. )

काळू--( विस्मयानें ) या वेळीं तूं नेमकी इथं कशी आलीस ?

तारा--येऊं नको तर काय करूं ! त्य़ा मेल्या निळ्यानं माझी अगदी पांढ पुरवली आहे. मी घरीं गेळें तर तिथ हा खडा मारल्यागत हजर, मला त्याचौ फार भौति वाटते.

काढू--काय म्हणाला तुला तो

तारा-<इसरं आणखी काय म्हमणार ! आपला सरळ आंत आला नि र्मक्क बाक हात धरळा. साऱ्या मुळखाचा निळंज्ज आहे मेळा !

काहू--स्वाळा साफ सांग कीं, पन्हा माझ्य! दारांत पाऊळ टाकू नकोल जशयून. तो यायच्या आंत तू दार का बंद केलें नाहीस

लारा--मी पुढल दार लावूम घेतळे तर तो मागीक दारानं आंत घुसला.

अंक२रा - 4

काळू-त्याला चांगला हात दाखवायचा होतास.

तारा--मी बाईंमागूस आगि त्यांतून घरांत एकटी ! तो तर अगदी तरे झालला होत. मला तो थोडाच बघणार ! त्यानं माझ्याशीं दांडगाई आरंभली. मी भौतीनं मनांत थिजून गेले.

काळू---जवळपास कोणी नव्हतं कां £

तारा--माझे घर गांवाच्य़ा एका टोकाला आहे. त्यांतून मी इथं नवखी असल्यानं शेजारची माणसं माझ्याशी फटकून वागतात. आणि या काळानं तर माझा गळाच धरला.

कोळू--मग त्याच्या तावडींतून तूं सुटलीस कशी

तारा--मी त्याला हरतऱर्‍हेन सांगून पाहिल. पग तो कांही केल्या वळणा- वर येइना. त्याचा आपला एकच हेका * त्या काळूचा नाद सोड अन्‌ माझ्या बरोबर चल ! त्याच्याबरोबर जाऊन मी काय़ करूं त्यातलं एक लाज सोडली पण तसं करून मला चालेल कां !

काळू--मला वाटलं नव्हतं तो या थराला जाईल म्हणून. त्या गाढवानं अगदीच ताळ सोडला तर !

तारा--मी भारी गोंधळून गेलें. काय करावं तें मला कांही सुचेना, अन्‌ तो तर धरणं घरून बसला. आतां या भोगाला काय करावं ! कुठली त्याच्याशी ओळख झाली असं मला होऊन गेलं.

काळू--मी असतांना त्याच्या ओळखीची गरज तुला कां वाटली £ तुझ्या चेचलपणाचं हें फळ आहे बर !

तारा--मी त्याच्याकडं मुद्दाम का गेल होते. सहज एकदा वाटेंत गाठ. पडली. मी त्याच्याकडे पुन्हा वळून सुद्धां पाहिले नाही. तोच लाळ घोटत माझ्या पाठीमा|ंगं लागला, या लोचटपणाला काय म्हणावं मी जरा त्याची

दर पाहिला कवि

गमत करावी म्हणून मनाशी ठरवलं पण हं भलतच झालं ! आतां त्यानं माझा गळाच धरलाय --

काळू --_त्याच्या पाठोपाठ जावं असं तेव्हांच मला वाटल होतं. पण तो इतका पागल असेल, याची मला कल्पना नव्हती. त्यावेळीं मी तिथ असतो तर त्याला तिथल्या तिथंच खलास केला असता. माझ्या तारेला त्रास देतो म्हणजे काय गोष्ट आहे ?

तारा--तो मेला माझ्यापुृढनं मुळीच हलेना. माझी छाती घड डू लागली. कोणाला हाक मारावी तर तोंडातून शब्दहि उमटेना, तेवढयांत त्याची नजर चकवृन मी जरा बाजूला झालें मात्र, तेवढ्यांत त्यानें आपल्या कमरेचा खजीर काढून माझ्यावर रोखला. हा. आतां काय करील या घास्तीनं माझी अगदी गाळण उडून गेली. ( भ्याल्यासारखं दाखवित. )

काळू--( दांत ओठ खात ) थांब! तो लेकाचा फार माजलाय. तो 'पुन्हा माझ्या हातांत सापडू दे तर खरा. त्याला या जगांतूनच नाहीसा करून टाकतो. बरं, पुढं काय झालं £

तारा--अरून फिरून त्याचं आपलं म्हणण हेच--"' माझ्याशीं लग्न करीन असं वचन दे. नाही तर तुला अन्‌ त्या काळूला, दोघांनाहि स्वगाची वाट दाखवीन ! आतां तूंच सांग बरं, असल्या पिसाटाच्या हातांत आपली मान कोणती प्रेमळ तरुगी द्यायला तयार होईल

काळू-- ऐटीनें ) तुझे म्हणणं अगदी बरोबर आहे. त्याला माझ्या सारखाच दिलदार सोंगडी पाहिजे. बरं, त्यावर तूं काय केलंस !

तारा--ठकाला ठक झाल्याशिवाय उपाय नाही, असं मी मनांत आणल आगि थोडी लाडीगोडी लावून त्याला तसे वचन--खरं नव्हे हं-- खोटंच वचन दिले. तेव्हां तो सर्मंध जरा शांत झाला. मग मी त्याचा हात धरून त्याला बाहेरची वाट दाखविली, पण जातां जातां त्यानं मार्ग वळून अशा भेसूर

अंक२ रा द्दे

नजरेनं माझ्याकड पाहिल म्हृगतोस--माझ्या काळजाचं पाणीच झालं. तो इतक्यांत परंत येत नाही याची खात्री करून घेतली अन्‌ इकडंच घावत आलें. पुन्हा गांवांत जायला माझं मन धजत नाही.

(भय वाटल्याचा आव्रिभोव करते. काळू तिला जवळ घेतो. )

काळू---तारू ! तूं अशी घाबरू नकोस. मी तुझ्याजवळ असतांना तुझं नांव काढायला त्याची काय माय व्यायली आहे तुझे प्रेम माझ्यावर आहे हें तूं त्याच वेळीं त्याला माझ्यासमोर सांगायला हवे होतंस, म्हणजे त्याची जीभ आपोआप ठलुली पडली असती. औषधावांचून खोकला गेला असता--

तारा--पण आतां तुला सांगते ना! माझं प्रेम तुह्यावरच आहे-”- ( लाजते )

काळू-हें अगदी खरं आहे ना ! नाहीतर पुन्हा आपलं मागील अंका- वरून पुढे चाळू असं होईल. एकदा ठेच लागली म्हणजे जपून चालावं लागतं.

तारा--तो निळ्या मला भेटावा म्हणून मी नवस का केला होता ! तोच आपग होऊन माझ्या गळ्यांत पडला, हा काय माझा गुन्हा आहे?

काळू--इथच तुझी पहिली मोठी चूक झाली. पहिल्याच खेपेला तूं त्याला झाडला कां नाहीस भलत्याच ठिक'गो. भीड धरली कीं कुसळाचं मुसळ होऊन बसत.

तारा--जितका कोळसा उगाळावा तितकातो काळाच! मी फिरून त्याचं नांवहि उच्चारगार नाही. तूंहि मागले कांही मनांत आगतां माझं म्हणजे लक्षांत घे. गेली ती गंगा अन्‌ राहिलं तें तीथे !

काळू--हें तीथ ध्यायला माझी ना नाही. पण त्यानं मनाची तहान भागेल ना ! पहा बरं, तूं फिरून कांही चाळे केलस तर ते मला बिलकूल मंज्र होणार नाहीत. आधी कडू अन्‌ मागनं गोड ! नीर विचार कर आगि मगच होय म्हृग, जळतं घर भाड्यानं घ्यावं कुणी !

६४ पहिला कावे

तारा--तुझी अजून खात्री कशी पटत नाही! मी इतकी जीव तोडून सांगते आहे पग तुझं आपलं पहिलंच पुराग चालूं आहे. खरंच, तुला सोडून मी कुठंहि जायची नाही, अगदी तुझ्या गळ्य़ारपथ !

काळू--माझ्या गळ्यावर हात मारायला तझ काय़ जातंय? चचल स्त्रीच्या मनाचा अंत लागणं कटींग असतं---

तारा--पुरुषाचं हृदय इतकं कठोर असेल असे मला वारले नव्हत. माझ्य़ा प्रमाची हाक तुला कळत नाही ना | भिक्षेप्राठीं मी पदर पसरला पग त्यांत घोंडा पडला, तुला जर माझं एवढं ओझे वाटतंय तर मी तरी जास्ती आग्रह कशाला करूं |! झाला इतका आपला सहवास पुरे झाला. तुझी आगि माझी ही दोवटची भेट-( रागानें तोंड फिरवते. )

काळू--खरंच रागावलीस तूं (तिला जवळ घेत) माझी बाई ती! अशी गप्प काय राहिलीस-काय होतंय तुला ( उसन्या रागानें ती त्याच्या- पासून दूर सरते. तो पुढे होऊन तिचा हात धरतो. )

तारा--हा धरलेला हात सोडगार असशील तर पुन्हा मी तुझ्याशी कध्धी कध्धी म्हणून बोलणार नाही. तुझा खळ होतो पण माझा जीव जातो !

काळू--मी आपलं तुझे मन बघितले. रुसव्या फुगव्यांठच प्रेमाची खरी मजा असते. तोंड गोड करून माझ्याकडं एकदा बघून हास बरं ! बोलत कां नाहीस पुन्हा लहर आली वाटतं ! हा मुक्‍्य़ाचा कारभार मला झेपत नाही.

'तारा--हीं सारीं सोंगे मला समजतात म्हटलं. मोकळग्रा मनानं वचन दे म्हणज माझा संशय फिटल.

काळू--( हृषभरानें ) हें घे वचन ! ( तिचा हात धरून तिला आपल्या- कडे ओढतो. तौ आढेवेढे घेते.)

तारा--तिकडं पाहिलेस कां त्या बहरलेल्या वृक्षाला ती फुललेली लता कशी बिलगून राहिली आहे ! तुझ्या शेजारीं असंच उभं राहण्यांत माझ्या जिवाला नवी पालवी फुरत आहे.

अंक२ रा

काळू--झालं ना तुझं समाघान ! ( ती मान हलत्रते. ) अशी माझ्याकडं रोखून काय बघतेस

तारा-र्‍-जं बोळून दाखवितां येत नाही तं डोळ्यांनी ओळखून घेण्यांत मनाला सुख वारतं.

काळू--माझ्या मनांतली एक गोष्ट मी तुला सांगतो. येथून आपग दोघं दुसऱ्या दूर गांवी जाऊं आगि त्या ठिकाणीं आपल्या प्रीतीच्या संसाराचे खरं झाललं स्वप्न पाहूं !

तारा--मलाहि तसंच वाटतं. नव्या वनांत, नव्यानं बांधलेल्या घरट्यांत, आवडत्या राघूबरोवर नांदाग्रला मंजुळ मेनला आनंदच होईल--

(११) आवडला बॉल हा, जिवाला हासत आला वसंत पहिला हार मनाहर गुंफिला ध०

माहन माझा मंजुळ बॉल प्रेमभावे जीव डोले दान घडीचा डाव रंगतां

गोड विसावा सापडला ॥१॥

( त्याचा हात घरून ) तुझ गोड बोल ऐकून माझ्या मनाला नव्या प्रीतीचे पंख फुटत आहेत. चल, या जुन्या जगांतून आपण भूरदिशीं दूर उडून जाऊं ! ( काळू कसल्यातरी विचारांत मग्न झालेला दिसतो ) कां, आतां विचार कसला करतोस

काळू--[ आजवी मुद्रेने ] तारू, एक क्षणभर थांब !

तारा--एकदा ठरल्यानंतर माणसानं असं माग पुढ करू नये. श्‌

द्दे पहिला कावे

काळू--तुझ्याशीं बोलण्याच्या नादांत एक गोष्ट तशीच राहून गेली. माझ बाळमित्र वाल्या कोळी हा मर्घांशीं माझ्याशीं भांडून घराबाहेर पडला आहे. त्याचं कर्त होईल ही चिता मला ढागली आहे.

तारा--इथून एकदां जायचं म्हटल्यानंतर इथं काय होइल ही काळजी कशाला ! आपग भलं कीं जग भळं ! अपल्या नव्या मंत्रीचे हितगूज रंगत असतांना हें जुन्या ओळखीचं शेपूर तू आपल्या पाठीला कां चिकटवून घेतोस मला तुझे भारीच नवल वाटतं.

काळू--असं म्हणून कसं चालेल ! त्याचा नि माझा फारां दिवसांचा घरोबा आहे. माझ्या डोळ्यांदेखत माझ्या मित्राचं घर खालीं यावं, हं मला बघवत नाही. तो बुवा होऊन गेल्याचं त्याच्या बायकोला कळतांच ती आकारा- पाताळ एक करील, नवऱ्यावर तिचं तसं फार प्रेम आहे. पग काय़ असेल तें देवाला ठाऊक ! दोघांचं कधी म्हणून पटत नाही --

तारा--मग जे पटत नाह्ले त्यांत तू॑ आपलं लक्ष कां घालतोस तीं दोघं नवरा बायको कांही का करीनात--आपल्याला काय त्याचं £ हें विकतचं आद्ध तुला कशाला हवं

काळू-माणसानं केवळ आपल्या पुरतंच पाहूं नये. झालेला प्रकार तिच्या कानांवर घालून तिला जागे करावे. मग ती आणि तिच नक्ीब |

तारा--तें कांहीहि असो ! माझ्यापासून एक क्षणभरहि मी तुला दूर जाऊं देणार नाही. ऐन वेळीं कसलं तरी खुप्षपर काढून माझ्या हातावर तुरी देण्याचा तुझा बेत असावा. तुझ्यासाठी साझा जीव कसा कासावीस झालाय अन तुझ्या मित्राचा तुला पान्हा फुटलाय, याला काय म्हणाव !

काळू--तूं आतां कांही म्हणूं नकोस मी असाच जाऊन वाल्याच्या बाय- कोला त्याची वाट दाखवून येतो. तोंवर तूं इथं उभी रहा. एवढं माझं कतव्य मला करूं दे. ( जाण्यासाठी वळतो. )

अंक२रा द्‌

तारा-“-' व्याकुळ होऊन ) इथं असे एकर उभं रहायला माझ्या मनाला धौर होत नाही. तूं तिकडे जाशील अन्‌ तो समंध येऊन माझ्या मानगुटीवर बसेल !

काळू--( पुन्हा परतून ) एक घटकाभर त्या पलीकडच्या झुडपांत तूं लपून रहा. तूं मुळीच चिंता करू नको. एवढे काम उरकून मी चटकन परत

येतो. ( जातो. )

तारा--माझी आठवग मात्र असू दे. नाहीतर तिकडंच अडकून पडशील ! तो निळ्या टळला पण हा काळ्य़ा बावचळला. एक खळगा चकविला तर दुस- ऱ्यांत तोल जाऊन पाय मुरगळला ! या चोरांच्या खेचाखेचींत माझ्या प्रेमाची कुचबणा मात्र झाली. वगळलं तर अडते अन्‌ गिळलं तर अडकतं-- मिळून काय़ दोन्हीकडून अडचण ! थोडा वेळ याची वाट पहावी. परत आला तर ठीक, नाही तर आपली वाट आपण धरावी हें उत्तम--[ सभोंवार पहात निघून जाते. ]

प्रवेश चवथा

( स्थळ --अरण्ग्र, वाल्या घाइनें निघाला आहे. पुढून हिरा येत. तो तिला टाळण्याचा प्रयत्न करतो.)

हिरा---(गहिवरून ) माझ्याशीं बोलायचं नाही असा पग केलाय कां असे निष्ठुर होऊ नका. या पायाच्या दासीवर दया करा ! ( ती त्याच्यापुढे पदर पसरते. वाल्या डोलतां तिळा वळसा घालून जाऊे लागतो. ती त्याला अडविते.)

वाल्या--! कठोरपगानें ) आल्या पावली तू परत जा पाहूं ! मी तुझा कोणी नाही--माझी वाट लवकर मोकळी कर !

६८ पाहिला कावि

हिरा-_तुम्हांला घेतल्याशिवाय मी परतायची नाही ! मला कळ- वितां तुम्ही असे एकटे कुठं निघालांत मी तुमची आहे---

वाल्या--नाही, मुळीच नाही ! मी तुझा नाही अन्‌ तूंहि माझी नाहीस. आतां माझा मी एकट आहे--मला जाऊंदे !

हिरा--पण तुम्ही जाणार कुठं

वाल्या--वाट फुठेल तिकडं !

हिरा--त्या वाटेनं मलाहि यावं लागेल. पतीच्या मागून जाणं हा सतीचा धम आहे. तो मला पाळलाच पाहिजे.

वाल्या--झाली एवढी माझी शोभा अन्‌ तुझी सोबत पुरे आहे. यापुढं तुझी नि माझी वाट निराळी !

हिरा--ती निराळी वाटली तरी दोघांनीं मिळून जायला हवं !

वाल्या--रानांतलीं दोन पाखरं संध्याकाळीं लांबून येऊन एका झाडावर बसतात. रात्रीच्या वेळीं त्या निवांत जागीं घुमविळेले अस्फुट सूर वाऱ्यावर सोडून, सकाळच्या प्रहरीं दोन दिशांनीं तीं दूर निघून जातात.

हिरा--स्त्रेरपणाने एक दोन भराऱ्या मारून एकमेकांचे गुपीत विस- रून जायला आपण माणसं म्ह्णजे कांही रानचीं उडतीं पाखरं नव्हेत ! आपली जन्माची गांठ पडली आहे. ती अशी सुटेल कशी

वगल्या--सुटली नाही तर तोडून टाकीन !

हिरा-_तें आतां तुमच्या हातीं नाही. जिथं तुम्ही तिथ मी ! झाडा- जवळून सावली कधी तरी निराळी राहील काय

वाल्या--त्या सावलीनंच . अंगाला चटका बसल्यावर वाटसरूनं तिथून जाऊ नये तर काय तिथंच तळमळत पडावं

हिरा-_हा दोष त्या सावलीचा नसून सभोंवार पसरलेल्या प्रखर उन्हाचा आणि तापलेल्या जमिनीचा तो गुण आहे. त्या वाटसराचा प्रेमळ सोबती

अंकर रा देशे

आपली जीवनछाया त्याच्यावर पसरायला सिद्ध असतांना त्यानं इतकं वाईट वाऱून कां ध्यावं

वाल्या--गोड बोलून तूं मला भरळ घाळूं पहातेस !

हिरा--तुम्हांला भुलवून मला असा कोगता स्वाथे साधायचा आहे. मला दूर लोटू नका ! पाण्य़ापापून लार कधी बाजूला करतां येईल का !

वाल्या--ते पाणीच आटले तर

हिरा--ती लाटही त्या पाण्याबरोबर सती जाइल !

वाल्य़ा--असा वाद घालून हा प्रश्‍त सुटणार नाहो. तुझे नि माझे आजपर्ग्रेत पटले नाही--

हिरा--आगि यापुढं परणार नाही या कल्पंनन हें फाटाफुरीचं घोरण स्वीकारणार होय मी तसं तुम्हाला मुळीच करूं द्यायची नाही. आपल्या आयु- घ्यांचे धागे इतके गुंतून गेळ आहेत कों, ते आतां परस्परांपासूत अलग करणे आपणा दोघांनाहि शक्‍य नाही. जळले नाही तरी त॑आपुलकोनं जळवून घेण्यां- तच जीवनाचा नवा गोडवा वाढू लागतो. उन्हाळ्यांतच वनाळा नवी पालवी फुटते.

वाल्या--पण ती उसळणाऱ्या झळांनी आपोआप कोमेजून जाते--

हिरा--आकाशींच्य़ा अमृतधारांनी तिला पुन्हा नवा तजेला चढतो !

वाल्या--ते कांहीहि असलं तरी मला तुझ्याजवळ यापुढं राहतां येत नाही. दोन बाजूंनीं डोंगरांतून वहात आलेल दोन झरे, कांही काळ एकत्र येतात 'पण मधेच त्यांना वेगळें वळग लागून त्यांचे प्रवाह बदलू शकतात.

हिरा-_हें खरं मानलं तरी अखरों त्यांना एकाच ठिकाणीं मिळावं लागतं '

वाल्या--माझ्यापासून तुला सुख मिळालं नाही--

१9० पाहिला कावे

हिरा--तसं तें नसून माझ्या हटवादी स्वभावाने मी तुम्हाला दुःख दिलं. मला त्याच फार खेद होतो. यापुढे मी तशी वागणार नाही.

वाल्या--आपलं लग्न झाल्या दिवसापासून मी पहात आहे. कांही तरी कटकट उत्पन्न व्हावी आगि आपग दोघांनी आपलं आंबट तोंड करून दूर बसावं. यांत कांही गोडी आहे कां तूंच सांग बरं ! आधी गरिबीचा प्रपंच अन त्यांत आपला हा छत्तीसाचा आंकडा--

हिरा--झालं गेल विसरून आणि गोडीगुलाबीनं वागून तो आकडा त्रेस- ष्टाचा करून घेतां येईल. आपल्या मनाविरुद्ध मी पुन्हा कधी जाणार नाही. मग माझं आपण एकगार ना!

(१२)

निष्टर कां झालां, रमणा ! ग्रेमळ या माना वचना घृ०

सोडुनि रुसवा गोड बोला

कठ माझा दाटला

येत पुढे जरि संकट माठे

ग्रम खर परतना॥ १॥

सोबत देतां एकमेकां

नेऊ परतीरा नोका

स्वप्न नवे हे जीवन पाह

म्हणा आपुली मला पुन्हा ॥२॥

वाल्या--या मायामोहांत पुन्हा मी पडणार नाही. आपणा दोघांना भांडण

केल्याशिवाय करमत नाही. दोन भांडीं पुन्हा जवळ आलीं कीं त्यांतून नाद हा निंघणारच ! माझ्या नादीं लागून तू आपल्या जिवाचा घात करून घेऊं नको--

अंक २९ रा ७9१

हिरा--_हा माझा जीव आतां माझा राहिला नाही. मी तो केव्हाच तुमच्या हवालीं केला आहे.

वाल्या--तो तुझा जीव मी तुला परत करतो.

हिरा--तसा तो परत घेतां यायचा नाही. उमललेल्या फुलाची पुन्हा कळी होत नसते.

वाल्या--पग तें फूल दगडावर पडून फुकट चाललं आहे.

हिरा--जगाला तो दगड वाटला तरी त्या फुलाचा तो देव आहे. त्याच्या पायीं स्वतांचं हृदय ठेवण्यांत त्या फुलाला दुःख होतां उलट सुखच वाटेल.

वाल्या-तुझ्याशीं शब्दांचा खळ खेळून माझी सुटका होणार नाही. माई मन पालटणं शक्‍य नाही. तू आलीस तशी परत जा ! प्राण गेला तरी मी मार्ग म्हणून वळणार नाही --

हिरा--माझ्या सौभाग्याचा हा अमोल ठेवा असा वाटेवर टाकून या फुटक्या कपाळानं मी घरीं परत कशी जाऊं जिथं हे पाय तिथंच माझा स्वर्ग !

वाल्या--तुला परत गेलंच पाहिजे. तुझ्या साखळीनं माझे पाय बांधल्या- मुळं मला सारखं ठेचकडून पडावं लागलं. तू इथून नोट निघुन जा !

हिरा--नका, असं बोळूं नका ! पतीत्रांचून सतीला गती नसते. माझं ऐकतां तुम्ही जाणारच असाल तर माझ्या हृदय़ावरूनच तुम्हांला चालत जावं लागेल ! हे पाय मी कधीहि सोडणार नाही--( ती त्याच्या पायाला मिठी मारते. वाल्याचा कंठ दादून येतो. त्याला पुढे, पाय टाकवत नाहो. क्षण- भरानें हिराला उचलून तो आपल्या हृदयाशीं धरतो. )

वाल्या--( अभिमानाने ) मला वाटलली गारगोटी शेवटीं हिरा ठरली. हिरा--मला सोडून आतां कुठंही जायचं नाही इं ! बाल्या--माझ्या मनाला लागलेली तळमळ तुला मी कशी सांगू !

१७२ पहिला कावि

हिरा-जुम्हांठा आठवतं कां £ चौथा महिना संपून बहिर्ला नुकताच पांचवा महिना लागला होता. माझ्या बाळाला तुम्ही जीव कीं प्राण करायचे. त्या दिवशीं उजाडतांच कांही कारणावरून आपला असाच खटका उडाला होता. तुम्ही सकाळीं वैतागानं घरामधून माझ्यावर रागावून निघून गेलांत. काळजीनं माझा जीव कसा टांगणीला लागलेला होता. तिन्हीसांज टळून गेली तरी तुमची स्वारी घराकडे परतली नाही. मला चेन पडेना आणि बाळ कांही केल्या राहीना. तसाच बाळाला उराशीं घेतला अन्‌ तुम्हांला शोधायला म्हणन बाहेर पडले आक्राश काळ्या ढगांनीं भरून आलं होत. रागाच्या भरांत तुम्हीं आपल्या जिवाचं कांही बर वाईट करून घेतलं कीं काय, या कल्पनेनं माझ्या सवागाला थरकांप सुटला | मी तुम्हाला किती हाका मारल्या पण त्या वादळी वाऱ्यांत विरून गेल्या. बाळ सारखा रडत होता अन्‌ मी तुमच्यासाठीं वेडी होऊन तुम्हांला हाकारीत होते. इतक्यांत मोठा कडकडाट होऊन डोळ्य़ापुढं सळकन्‌ चीज चमकली, आणि मला भोवळ आली. तेवढ्यांत पसरलेल्या दाट काळो खांतून वाऱ्याच्या वेगाने तुम्ही मला आणि माझ्या लहान लाडक्याला सावरून धरलंत. तुमच्या प्रेमाचा आसरा मिळतांच बाळ शांत राहिला. आपल्या दोघांच्या डोळ्यांतून अश्रूंची रिमझिम चाळू होती. आकाशाच्या मिटलेल्या डीळ्य़ांतूनही अभ्रबिदू पाझरू लागले. सारी सृष्टी देखील गहिवरून गेली होती. त्या प्रीतीच्या तिरंगी आसवांत नव्या आनंदाचं चांदर्ग भरून राहिलं होतं---

काल्या--मधुर स्मृतींच्या अमृतानं संसारांतल्या निराशेचं विष प्रेमी जीव थचवून टाकतो. गोड सहवास हा सुखाचा गाभा आहे !

हिरा--मला सोडून तुम्ही पुन्हा दूर जाणार नाही ना!

वाल्या--असं काय करतेस हिरू ! आजचा हा प्रसंग मोठा अवघड आहे. आतापर्यंत केलेल्या पातकांचा पाढा माझ्या निदेय देवापुढे मला वाचून दाखविला पाहिजे. अगगित अपराधांनीं आगि दुष्कृत्यांनीं माखलेले हे माझे हात निर्मळ झाल्याशिवाय मला खर॑ समाधान मिळणार नाही. अनेकांचे शिव्या

अंकर रा ७२

शाप माझ्या कपाळीं चडले आहेत. ते पुसून टाकण्याचं साधन मला मिळेल तेव्हा मान वर करून जगाकडे बघण्याचे धेय माझ्या अंगीं येईल. गमावलेली मागुसक्री पुन्हा कमावल्याविना माझ्या मनाची होणारी तगमग थांबणार नाही. यासाठीं कांही काल तुझ्यापासून दूर राहण्याचं मी ठरवलं आहे. एका दिव्य संदेशानं माझं निजलेल हृदय जागं झाल आहे. त्या आवाजाचा शोध करीत मला निघालं पाहिज, माझ्या टीचभर घराच्या जगांत मी रमून गेलों आणि घराबाहेर तळमळणार॑ जग मला पारख झालं. ( एकदम गंभीर होऊन) तं पहा ! कोणीतरी अस्पष्ट पग तेजोमप्र आकृती मळा बोलावीत आहे. खरी सती ही पतीची स्कूर्तिदिवता असते. आपल्या अमृत बोलांनीं कतेव्य करायला ती त्याला धौर दते.

हिरा--तुमचं अंतःकरण इतक थोर आहे हें पाहून मला आकाश ठेंगणं झालंय. पुरुषाप्रमाणे स्त्री देखील त्याग करूं शकते ! मी तुमच्या कायोच्या आड येऊं इच्छित नाही. जं तुमचं सुख तेंच माझे सुख !

वाल्या--( समाधानांने ) दोषंमधला दुजेपगाचा पडद' नाहीसा झाल्या- मुळ मनाला मागं खेचणारी हुरहुर आज दूर झाली. तुझी मंगल प्रीती मला सोबत देऊन माझा माग उजळ करील. ये, अशी माझ्यासरशीं ये ! तुला एक- वार डोळे भरून मला पाहूं दे. ( हिरा त्याला आलिंगन देते. ) बोढ ! अशी. अबोल कां बनलीस तुझ्या डोळ्यांत हे अश्रू का बरं आले !

हिरा---( सस्मित मुखाने ) हे अश्रू दुःखाचे नसून अपूर्व सुखाचे आहेत. ते तसेच वाहूं देत ! अंतरींच्या प्रिय मूर्तीवर प्रीतीचा अभिषक चालला आहे. या पाझरणाऱ्या अश्रूना त्यागाचा दिव्य प्रकाश मिळून त्यांत आपल्या नव्या जीवनाचं प्रतिबिंब उमटलं आहे. प्रीतीच्या ज्योती नेन्नांत पाजळून आणि हृदय़ांतल्य़ा तुमच्या हाकेला देत एकेक दिवस मी धोरान कंठीन.,

वाल्या--बहिरूचा नीट सांभाळ कर ! तो जरा अवखळ आहे. माझ्या प्रमाची ठेव त्याच्या रूपानं मी तुझ्यापाशी ठेवली आहे. ती जिवापलीकडं जतन कर. देव तुला सुखी ठेवो !

७० पहिला कावे

हिरा--( सद्रदित होऊन ) या अमोल आनंदाचा हा सुवगक्षण तुमचा वियोग सहन करण्याचं घेये मला देत आहे. भेटीच्या सुखापेक्षा हे विरहाच. दुःख मला अधिक प्रिय वाटते !

वाल्या जुन्या ओळखीचा आणि जोखमीच।' उरठेला पसारा आवरून मी पुढच्या तयारीला लागणार. तरी आतां ही जिवाची खूग ओठों ठेवून तझे हे थरथरणारे हात मार्ग घे--

(१३) वाल्या--निराप मजला दे झणि सखये, जाता मी आतां ! हिरा--तळमळ लागे कोमळ हृदया प्रेममरे बघतां घ०

वाल्या--नकळत नयनीं आशा फुलते

हिरा-- तोड़ाने काथे कां तुटते नाते

वाल्या--हास गडे ! तूं पुन्हा एकदा धीर मना दतां हिरा--नस जिवा या जगा विसावा तुझ्यावना नाथा! ॥१॥

वाल्या--निमेळ आहे प्रेम आपुले

हिरा--प्रिय देवत हं प्रसन्न झाले

वाल्या--गालावरचे अश्रू बदती सुदर भावकथा

हिरा--आज मिळाला असृतघट हा गीत नवेगातां २॥

( 'जातो मी आतां'-_-असें म्हणत वाऱ्या जातो. त्यच्याकडे दृष्टि लावून हिरा पहात राहते, )

अक रा समाप्त

अक रा

प्रवेश पहिला ( स्थळ--अरण्य, तारा प्रवेश करते बावरलल्या नजरेने सभोवार पहांते )

(१४) तारा--रमवी आज्ञा मना, पुन्हा ही हुरहुर लाग चाहुल घेतां भूल पड लना घृ०॥

बावरली कां वनबाला हो

जोडीवांचान गोडी नाहो

आठवुनी त्या प्रेमळ बचना येत सखी मालना॥ १॥ पदरी पडतां पहिला वाटा

नकळत हृदया रुतला काटा

वेडी माया छॉडित वीणा साडुनि ती यातना ॥२॥

( भीत भीत हलक्या पावलांनी पुन्हा चाहूल घेते. )

हा काळू गेला तो गेल,च |! काय पण ठुच्चा माणूस आहे. त्याच्या लाघवी भाषणाला फसून मी या जंगलांत अशी एकटी मुठींत जीव घेऊन राहिले. मला चांगलीच अद्दल घडली. चोरट्या प्रीतीच्या काटेरी खळानं माझा कोवळा जीव चुरमळून गेला. माझंच नशीब खोट ! दुसर्‍याला नांव ठेऊन आपलं नांव उजळ होइल कां इथून आतां काढतां पाय ध्यावा हें बरं एकाद! लांडगोबा दबा घरून जवळच बसलेला असायचा--( तारवटेलला निळू येतो.)

निळू--ए ग्रांवभवानी ! कुठं चाललीस ? मला चटक लावून इकड सटकलीस काय---

५७९ पाहिला कावि

तारा--( बावरून ) या झाडीच्या पलीकडं माझ्या मायेची एक मावशी राहते, ती फार आजारी आहे असा निरोप आला, तिला भेटावं म्हणून मी लग- बगीन निघालं होतें.

निळू-ाही लंगडी सत्रब इथं चालायची नाही. थांब, त्या मावशीच्या ऐवजीं तुलाच एक गोळी चांगळी उगाळून देतो. तूं काय मला सांबापुढचा समजलीस होय

तारा--( लाडाने हसत ) असं काय बरं निळू ! तू माझा आहेस ना ! [ त्याच्या जवळ जाते. )

निळू--दूर हो आधी ! तूं माझी नाहीस. तुझे सारं कारस्थान मला पुरत समजून आलंय. कावळ्याच्या घरट्यांत सुपचूप अंडी घालून दूरच्या फांदीवर कुहूकुहू करीत सुरकणाऱ्या त्या कपटी कोकिळेचा कावा केव्हांतरी कळनोच. माझ्यापेक्षा त्या काळविटाचा जिव्हाळा तुला जास्त वाटला !

तारा--[लाडी गोडी लावीत] तस नव्हे रे निळू ! कसं सांगूं म्हणजे तुझी खात्री पटेल. तोच निलज्जपगान माझ्या भोंवती घुटमळू लागला, त्याला मी काय करूं! तूं मला वचन दिल्याप्रमाणं भेटायला येशील म्हणून तुझी मी किती वाट पाहिली. असं काय करतोस रे ! पहिल्याप्रम|णंच माझी माया तुह्यावर आहे. माझ्याशी तूं सरळपणानं बोलत सुद्धा नाहीस. हीच कां माझ्या प्रेमाची तूं पारख केलीस

निळू-ती विषाची पारख ठरली ! माझ्यापुढे त्या प्रेमाचे पुन्हा नांव काढूं नकोस--

तारा---तुझ्या मनांत हा भलता संशय शिरलाय. तो आतां तूं काढून राक, एकदा म्हटलं ना ! मी तुझीच आहे--

निळू--पण मी तुझा होणे आतां अशक्य आहे. या प्रेमाच्या नाटकानं “] असा फिरून फसणार नाही, डोळे मिरून दु पिंगाऱ्या मांजराला पाठीवरचा >डगा दिसत नसतो.

अंक रा ७9

तारा--मी तुला नको आहे ना ! मग पुन्हा पुन्हा माझ्या माग कां लागतोस ?

निळू -- [डोळे फिरवून] माझा गळा गुंतविगार्‍्या या प्रेमाचा मी सूड घेगार आहे. कुठं आहे तो तुझा काळ्या

तारा--मला काय विचारतोस £ तूंच त्याला शोधून पहा ! माझ्या वाटेंतून तूं बाजूला हो. तुझ्या नादीं लागण्यांत अथे नाही.

निळू--मी तुला माझ्या हातची जाऊं देगार नाही. खोटं प्रेम करून माझ्या जिवाला जहरी झरगी लावलीस, त्याचं हें प्रायश्चित्त भोग आतां ! [खंजीर उपसतो.]

तारा--चोर तो चोर आगि वर शिरजोर ! पुढं काय होईल याचा विचार केला आहेस कां (घाबरून मागे सरते. )

निळू--सारा विचार आधींच करून ठेवलाय मी. तुझ्या प्रीतीचा आणि या जगाचा मला अगदी वीट आलाय. जिथ माझी सुखस्वप्ने विरघळून गली, तिथ हें काळं तोंड घेऊन मी राहगार नाही. तुझ्या नांवानं मी संन्यास घेगार आहे, पग त्या आधीं युलगुल गोष्टी बोठून माझ्या काळजाला चावा घेगार्‍या या उनाड मेनेची मानच मुरगळून टाकतो. काय समजलीस तूं? तुझ्या रक्‍तानं लाल झालेल्या हातानं त्या तुह्या साथीदारालाहि चांगलाच रंगवतो. (त्वेषानें तिच्य़ाशीं लगट करून तिच्यावर खीर रोखतो. ती भिऊन किचाळते. अकस्मात्‌ वाल्या कोळी येऊन त्याला मागे खेचतो. )

वाल्या--कोण, निळू ! एका अनाथ स्त्रीवर हात टाकायला तुला शरम नाही वाटत फिर मार्ग !

निळू--( चकित होऊन ) कोग, वाल्या कोळी--चोरांचा पुढारी--- आमच्या टोळीचा नाईक कां हें मला सांगत आहे मी स्वप्नांत तर नाही ना<-पूर्वेचा सुये परिचमेकडं उगवला काय

"७८ पहिला कावे

वाल्या---होय ! तोच वाल्या, अद्ट्ल दरोडेखोर आगि वाटसरांचा काळ तुल हें सांगत आहे. नीट डोळे उघडून नाझ्याकडे पहा !

निळू--या वेळीं मी तुला ओळखत नाही. मला उपंदेश करणारा तू कोण

वोल्या-ामी तुळा तसे करूं देगार नाही. तिचा जीव तूं काय म्हणून घेतोस

निळू---आपल्या विषारी प्रेमानं तिने माझा जीव घेतला. त्याचा मोबदला तिला मी देत आहे.

वाल्या--हा केवळ वेडेपणा आहे. ज॒लमानं प्रेम मिळत नसतं -- तं हळूवार प्रेमानंच मिळवावे लागतं. मुंगी होऊन साखर खाण्यांत गोडी असते. तूं आपलं अविचारी मन आवरून घे. तुझ्या या मावळत्या नायकाचा तुला हा अखेरचा हुकूम आहे.

निळू-- तो मी मुळीच मानणार नाही.

वाल्या--तुला तो मानावाच लागेल ! ( तारेकडे वळून ) बाई! मी इथं आहे तोंवर तूं आपल्या वाटेनं निघून जा! प्रेमाची वाट फुलांपेक्षां काट्यांनींच अधिक भरेलली असते. प्रणयाच्या पहिल्यावहिल्या नवलाईनं तरारणाऱ्या तरुण जीवाला त्याचं भान नसतं. पग एकादा अचानक फटका बसून तो भरारी मार- णारा भोळा जीव धरणीवर कोसळतांच, त्याच तीक्ष्म काट्यांनीं त्याचं हृदय रक्‍तबंबाळ होऊन जातं, तेव्हांच तो शुद्धीवर येतो. वेळ निघून गेल्यावर तळम- ळत राहृण्याखेरीज दुसरा मागे उरत नाही. आंघळेपणानं आधीं गळ्यांत गळा घालायचा आणि मग एकमेकांचा गळा दाबायला टपून बसायचं, थाला काय माणुसकी म्हणतात अशा रीतीनं प्रेमाचा खेळ मांडण्यांत दोघांनाहि धोका असतो. असो, तूं जा आतां.

तारा-_( कृतज्ञतेनं ) तुम्ही आज मला जीवदान दिलंत. तुमचे उपकार -मी जन्मभर विसरणार नाही. ( जाते. )

|

अंकर रा १9९

निळू---<( चिडून ) तूं आमच पुढारी म्हणून मी तुझी गय केली, पण तूं तर माझ्याच मुळ'वर आलास. ही माझी शिकार आहे. तिचा निकाल मी माझ्या मर्जीप्रमाणं लावीन, तू मधे पडूं नकोस ! (तिला धरायला धावतो. वाल्या त्याला रोखतो. )

वाल्या--एका असहाय्य अबलेला गांठून तिच्यावर बळजोरी करणं हें माणुसकोला लांछन आणणारं कृत्य आहे. ही काय प्रेम करण्याची रीत झाली हा प्रीतीवरचा अन्याय आणि माणुसकीची विटंबना मी उघड्या डोळ्यांनी कदापि सहन करणार नाही.

निळू-- तू सुकाट्यानं इथून चालता हो. माझा राग मला आवरणार नाही. सोसाट्याच्या वाऱ्यानं रानांतल्या ठिगगीचा वणवा व्हायला वेळ लागत नाही. तुझ्यासारख्या उलट्या काळजाच्या गळेकापून मला नीतीचे घुटके पाजू नयेत.

वाल्या--हा अतिप्रसंग होत आहे. माझ्या शब्दाला मान देऊन तूं हा आततायीपणा सोडून दे.

निळू--[ही नसती पंचाईत तुला करण्याचं कारण नाही. तूं दूर होत नाहीस? ( वाल्या मानेने ' नाही ' असे सुचवितो. निळू खंजीर उगारून ) तर मग घे हे बक्षीस !

वाल्या--( भेदक दृष्टीने पहात ) दुसऱ्यांचे जीव घेऊन मी आजवर जगत आलों. पण आतां दुसऱ्यांना जगविण्यासाठी माझा जीव मी अपणे कर- णार आहे. असा उभा कां राहिलास चल ये, बघतोस काय १६ ( आपली छाती पुढें करून ) आपले हत्यार तूं खुशाळ माझ्यावर चालीव, आणि तुझ्या मोथ्यां- तळा भडकलेला अंगार माझ्या हृदयांमधून उसळणाऱ्या लाल कारज्यानं विझवून टाक ! चल ये, मी तयार आहे. ( निळू खंजीर उगारून पढें पाऊल टाकतो पण दुसर्‍याच क्षणीं गहिवरून वाल्यांचे पाय धरतो. वाल्या त्याला ग्रेमाने उठवितो. )

८० पाहिला कावे

निळू--( परचात्तापानें ) माझी चूक मला कळून आलो. आज तूं माझ्या डोळ्य़ांत अजन घातलेस, मी तुळा टाकून बोलला, यांची मला तूं क्षमा कर !

वाल्या->मी तुला क्षमा केव्हांच केली आहे. माझी टोळी मी मोडून टाकली असून तुलाहि मोकळा करीत आहे. आजपासून तू स्वतंत्र झालास ! झाल्या गोष्टींचा खेद करतां आगि स्वताच्या सुखासाठीं दुसर्‍यांना दुःख देतां, यापुढं तूं चांगल्या मागोने वागण्याचा प्रयत्न कर ! मला थांबायला सवड नाही. देव तुला चांगली बुद्धी देवो ! मी जातो आतां. ( जातो. )

निळू--तुझे हे बहुमोल बोल माझ्य. कानांत नेहमी घुमत राहतील |

( जातो. ) प्रवेश दुसरा ( स्थळ-<वन, पूवस्थठीं नारद भजन करीत उभा आहे. ) (१५) नारद-- दीन जना दावे दया

धाव पाव भगवंता !॥ धघ० |

तळमळते मानवता ये आतां गुणवंता ! जगती या पतितांना कोणि नस त्राता ॥१॥

ब्रीद तुझे साथ करी आनेद्‌ भुवन भरी खुख लाभो सकलांना प्रमळ तूं माता ॥२॥

अंक रा टर ( खालीं मान घालून मंद गतीने वाल्या येतो. ) ये, असा जवळ ये ! दूर कां उभा राहिलास इतकं मनाला लावून घेऊ नकोस

वाल्य़ा--आपल्या जवळ येण्याची माझी योग्यता नाही. लोखंडाच्या तुकडयानं परिसांची बरोबरी करू नये,

नारद--परिसाची भेट घडत असतांना लोखंडानं लाजून कसं चालेल तोच त्याच्य़ा भाग्याचा सुवणेक्षण ! कामघेनु घरीं चाळून आल्यावर तिच्या चऱ्यापाण्याची काळजी कोणी करील कां

पाल्या--( खालीं मान घालून ) माझे पापी मन मला खात आहे. माझ्या हातून अक्षम्य अपराध घडले आहेत. 'माणूस' या नांवाला मी कळक आहे. |

नारद--तू कसाहि असलास तरी मला जवळचा वाटतोस. चका सवाच्या हातून होत असतात. चकगं हा मनृष्यस्वभाव आहे. पण एकदा झालेली चूक पुन्हा करणं, हे माणूस असल्याचं खरं लक्षग होय. बरं, तूं गेला होतास त्याचं काय झाले तुझ्या पातकांचा भार हलका करायला तुझ्या प्रमाचीं माणसं तयार आहेत ना !

वाल्या--माझी समूळ निराशा झाली. मायाममतचीं स्वप्नं पार वित- ळून गेलीं. माझा सारा अहेकार मातीमोल ठरला, माझ्या डोळ्यावरची झापड दूर झाली ---

नारद--तू॑ लवकर सावध झालास याचे मला समाधान वाटतं. कारण. त्यांत तुझ कल्य़ाग आहे, देवानं सोन्यासारखा नरंदेह दिला तो काय़ चिखलांत लोळण्परासाठीं १९ माणसाच देव होतो तसा त्याचा पशूही बनतो. हं सारं त्याच्या कृतीवर अवलंबून आहे.

०__& पू वाल्या--माझं मन आतां पुरतं पालटून गेळ आहे. माझ्या पूवोयुष्या वी मला खरोखर खंत वाटते. आपग मला खरोखर देव भटलांत. तुम्हीच

८२ पहिला कावि

माझा उद्धार करा ! हे पाय सोडून मी कुठंही जागार नाही, ( त्याच्या पायांवर डोके ठेवतो. नारद त्याला प्रेमानें उठवितो. )

नारद--ज्याचा उद्धार त्यानंच करून घ्यायचा असतो. बांधलंली शिदोरी अन्‌ सांगितलेली अक्कल किती पुरणार !

वाल्या--मला असं अधान्तरीं लोंबकळत ठेवूं नका. माझ्या मनाची तळमळ शांत होईल अश्शी शिकवण मला द्या !

नारद--तुझ्या मनाचा पूण निश्‍चय झाला आहे ना ! नाहीतर पुन्हा पहिल्या वळणावर जाशील, कुत्र्याचं शेपूट नळींत आहे तोंवर सरळ असतं, पण पुन्हा वाकडं ठदहदायल वेळ लागत नाही.

वाल्या--कांही झालं तरी माझं मन आतां फिराथचं नाही. एकदा दारां- तुन हुसकून दिलेलं कृत्रं पुन्हा तिकडं वळत नाही. मग मी तर माणूस आहे !

नारद--“माणुसकी सोडलीस म्हगून तर असा गटंगळ्या खात राहिलास. माणूस हाच स्वताचा शत्रु आगि मित्र आहे.

वाल्या--कृतकमाचा मळा आतां फार खेद होतो. माझ्या नांवाला लाग- लेला काळिमा दूर करण्याचा उपाय आपण मला सांगा. त्यासाठीं वाटेल तो देहदंड सोसायला मी तयार आहे.

नारद--पश्‍चात्ताप हेंच खर प्रायश्चित्त ! आत्मशुद्धीचं तेंच एक उत्तम साधन आहे. सुविचारांच्या किरणांनी जीवनावर चढलेली काजळी झडून जाते, रिक्षेचं भूय मनुष्याला तातयुरत सावच करू शकतं. स्वताला सुधारण्याचा दढ संकल्प मनाशीं करून त्याप्रमाण अखंड आचरण ठेवण्याचं त्रत घेतलं पाहिजे. सुघारणची खरी कळ मानती मनांतच असते. त्याठिकाणी बाहेरचीं साथन अपुरी पडतात.

वाल्या--आपल्या शब्दाबाहेर मी जागार नाही. माझ जीवन निमेळ करण्यांचा मी आटोकाट प्रयत्न करीन, माझे पूर्वीचे दोष विसरून जग माझ्या- कड आपुलकीनं पाहील कां

अंकर ३8 रा ८३

नारद--जग हें एकाद्या अल्लड बालकातसारखं आहे. त्याला रुसायला आणि हसायला फार वेळ लागत नाही. कमळ चिखलांत उगवत म्हणून रसिक कांही त्याचा अनादर करीत नाहीत. सत्कृतीचा सुगंध आजि सह्ुगांचा प्रकाश तूं आपल्या जीवनांत भरून टाक. सत्यनिष्ठा आगि सदाचार या इहलोकींच्या दोन दिव्य संजीवनी आहेत. त्यांनींच मनुष्याचा खरा क्रायाकल्प होतो ! माझा उपदेश जागरूकपणानं उराशी बाळगशील ना! नाहीतर, नळी फुकिली सोनार अन्‌ इकडून तिकडे गेलें :वारे, ' असं होइल. गळक्या भांड्यांत ओत- लेली अमृताची घार मातीला मिळते. केवळ मी सांगतो म्हगून तूं. या मागीत पडलास असं होऊ नये. मी कांही तुझ्यावर बळजबरी करीत नाही. तुझ्या इच्छेप्रमागं वागायला तूं स्वतंत्र आहेस.

वाल्या--असे बोठून मला पुन्हा कां हिणवितां माझं हृदय मी आपल्यापुढे खळ केल आहे. आपण मला अभय द्यावं. मी आपल्या चरणीं शरण आलों आहे. शरणागताला सज्जन दूर लोटीत नाहीत !

नारद--' मी कोग ? याचौ तीत्र जाणीव उत्पन्न होणं हीच खुरी माणुसकी अगीं आल्याची खूण आहे, आणि तीच प्रगतीची अढळ पत|का---

हि

वाल्या-< प्रसन्न चित्ताने ) तुम्ही मला दिव्य दृष्टी दिलीत. हळू हळू नवी सृष्टी माझ्या डोळ्यांसमोर प्रगट होऊं लागली आहे.

नारद--कशाचीहि चिंता करतां एकनिष्टेनं भगवंताचे चिंतन करीत रहा. तुझ्या हातून अलौकिक काये व्हावं, अशी विधीची योजना आहे. त्यासाठी मी या ठिकाणीं मुद्दाम फेरी घातली.

वाल्या--. नम्रतेने ) तुमच्या कृपाप्रसादानं आज या फत्तराची सुवणंमूर्ती झाली. या चरणांच्या पुण्याईनं माझा पुनजन्म झाला. हरवलेला ठेवा मला परत मिळाला.

नारद--माझे बोल नौट श्रवण कर ! दीन दुबळ्यांच्या रक्षणासाठी आणि निराश झालेल्या जीवांना सुखाची छाया देण्यासाठीं श्री भगवान्‌, रामरूपानं या

८४ पहिला कावे

भूतलावर सत्वर अवतीण होणार आहेत. त्यांचं पुण्यचरित्र लिहिण्याचा-जगाचा पहिला कवि होण्याचा, पहिला बहुमान तुला मिळणार आहे स्वताच्या अभ्यु- दयाची आणि इतरांच्या कल्याणाची गुरुकिल्ली मी तुझ्या स्वाधीन करीत आहे. तिचा सदुपयोग कर! ही माळ घे, या चिपळ्या घे, आणि मी सांगतो त्याप्रमाणं हरिनामाचा जप कर, हं म्हण ! राम (वाल्या ' मरा म्हणतो ) राम-( पुन्हा “मरा? म्हणतो) राम-“-( तरी * मरा ? म्हणतो) ठीक आहे. “मरा? म्हण, पण रा ' वर जरा जास्त जोर दे. ( तसें म्हणतो त्याला प्रणाम करतो. ) तं कांही चिंता करूं नकोस ! माझा मंगल आशीवीद तुझ्या मस्तकीं आहे. ( त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवतो. ) वाल्या कोळ्याचा वाल्मिकी महषि होइल! तथापि. आत्मशुद्धीसाठीं कांही काळ तुला तप करावं लागेल. अग्नींत पडल्यानं सोन्याची कस अधिक वाढतो. या ठिकाणीं आसन घालून तूं इश्‍वर चितनांत निमग्न हो. मी पुन्हा येईन (वाल्या डोळे मिटून नम्र होतो. नारद जातो. )

वाल्या--( डोळे उघडून ) हे दयामय परमेश्‍वरा, तुझी लीला अगाध आहे. तुझ्या चिरंतन कृपेचं कवच या पतिताला मिळेल का !

(१६)

सद्या प्रभराया ! पद्सेवा ही तव देवा नित्य सुखाचा काया धृ० ।॥

प्राणसखा तूं दीन जिवांचा अक्षय ठेवा मोक्षघधनाचा बेध निवारी घननीळा ! मानवला छंद मला

गाड तुझ गुण गाया ॥१॥

अंक३ रा ८प्१

भानहरी तव पावन लाला दावी करुणा या शरणाला नाम तुझे मंगल घेतां दे हाता मज आतां तुजविण हे जीवन वांया ॥२॥

[ नारदानं सांगितल्याप्रमाणं नामस्मरणांत रंगून जातो. ]

प्रवेश [तिसरा

"वहार ऐडिमह) (किक [ स्थळ---वाल्याचें घर, अंगगांत विचारमग्न स्थितींत हिरा उभी आहे. ]

हिरा--धीरानं त्यांना निरोप देऊन मी घरीं परत आले खरी, पग त्यांच्या भटीसाठीं माझं मन कसं अधीर झालं आहे. त्यांच्याविण सुनं भास. णाऱ्या या घरांत माझ्या मनाला करमत नाही. आमच्या प्रीतीचे पडसाद या सयाण वाटणाऱ्या जागेंत आहेत. ते सारख कानावर पडून माझा जीव अधिकच व्याकुळ होतो एका हिरव्यागार वृक्षावर दोन प्रेमवेडीं पाखरे रहात होतीं. त्या चिमुकल्या घरट्यांत नवसाच्या नव्या आनंदाचा किरण नाचू लागला. मनां- तल्या प्रीतीला आणि वनांतल्या नवतीला सोनेरी मोहोर आला. पण परस्पराला हळुवार साद देत असतांना, सुखाची नवी सृष्टी पहायला जिवाचा सोबती अचानक दूर निघून गेला. आशेचा ठेवा हृदय़ाशीं धरून ती भोळी प्रीती आपला जीव सारखी पाखडीत राहिली आहे. माझी आठवण त्यांना राहील का सला भेटायला ते इथं पुन्हा परत येतील ना ! पण अशी शंका तरी मला कां वाटावी [ बहिरू येतो. ]

बहिरू--[आइचय करीत] आई, तूं कुगाशीं बोलत आहेस £ इथं तर दुसरं कोणी दिसत नाही, माझे बाबा कुठं गेले

टदे पहिला कवि

हिरा--बाळ, असा इकडं ये ! तूंच आतां माझ्या जिवाचा आधार आहेसा.

बहिरू--अजून बाबा कसे आले नाहीत ! तूं बोलत कां नाहीस--तुला, कांही बोलले कां

हिरा--मला ते कशाला बोलतील !

बहिरू--मग तूं त्यांना बोळलीस होय ! म्हणून तुझ्यावर ते रागावले. असतील.

हिरा--मी त्यांना कांही म्हणाले नाही आणि तेहि माझ्यावर रागावले नाहीत.

बहिरू--मग बाबा तसेच कसे निघून गेले आई, सांग ना ! अशानं मीः तुझ्याशी बोलणार नाही, जा ! [ सुसतो. हिरा त्याला आपल्या जवळ घेते. ]

हिरा-रबाळ, आतां असं रुसायचं नाही. मी सांगेन तसं वागशील ना !

बहिरू--होय ! अगदी तूं सांगशील तसा मी वागेन. [ क्षणभर थांबून ] पण आई, हें बघ किनई माझे बाबा तुझ्यावर रागावले नसून ते माझ्यावर रागावले आहेत. म्हणून ते घरीं परतले नाहीत,

हिरा--काय केलंस तूं?

बहिरू--नवा पोषाख तूं मळा दिला नाहीस. मग मी बाबांच्या जवळ हट्ट घरला,.पण त्यांनी माझं बोलणं ऐकलं नही, आणि मला ते रागानं बोलूं: लागले. जुने कपडे घालून फिरायची मला लाज वाटते. आई, हें बाबांना कां कळूं नये ! त्यावेळीं तूं तिथ नव्हतीस. असं केल्यावर कुणाला राग यणार नाही मी पग त्यांना उलटून कांहीतरी बोललों. माझे मित्र माझी वाट पहात होते म्हणन मी तसाच मार्ग फिरला. मी हट्ट केला आणि त्रास दिला, म्हणून बाबा, परत आले नाहीत. आई ! त्या गोष्टींचे मला आतां फार बाईट वाटतं. मी' फिरून असे कधीच करणार नाही,

अंक रा ८७

हिरा--( त्याचा हात धरून ) तूं काळजी करूं नको. चल, आपण घरांत जाऊंया!

बहिरू--माझे बाबा आले तरच मी घरांत पाऊल ठेवीन. ते खरंच माझ्यावर रागावून गेल आहेत. थांब, मीच जाऊन त्यांना परत घेऊन येतो.

हिरा-- तूं एकरा कता जाशील ! तुला वाट सापडायची नाही.

बहिरू--तर मग तू चल माझ्याबरोबर ! ( तिचा हात धरून तिला ओढूं लागतो. ) अशी काय करतेस? चल ना ! तू आली नाहीस तर मीच आपला एकया जातो.

(तिचा धरलेला हात सोडून देतो. )

हिरा--बहिरू, अशी घायकूत करूं नकोस.

बहिरू--तूं येत नाहीस अन्‌ मलाही जाऊं देत नाहीस. हें काय आई!

हिरा--ते मला सांगून गेले आहेत.

बहिरू--तु खोटं सांगतेस. हे मात्र मी तुझे ऐकणार नाही. माझ्या वा्बांना परत आणीन. आणि मगच तुला हें तोंड दाखवीन, तूं रहा आपली तुझ्या घरांत. ( आईच्या तोंडाकडे बघतो. तितने डोळे भरून येतात. ) आई ! तुझ्या डोळ्यांत पाणी कां आलें? बाबा रागानं निघून गेले आणि तुला सोडून मीहि त्यांच्याकडे चाललों म्हणून तुला वाइट वाटलं होय ! ( ती त्याला प्रेमाने. पोटाशी धरते. बहिरू तिचे अश्रू पुसतो. )

हिरा--( त्याला गोंजारीत ) माझा बाळ तो ! बहिरू, तूं किती चांगला अहिस !

बहिरू--आई, तुला खरं सांगू कां मी £ इथं रहावं असं मला वाटत नाही. तूं देखील या ओसाड जागेंत राहूं नकोस, माझे बाबा कुठं असतील ग! आपण दोधं मिळून त्यांना भेटायला जाऊं या. तूं माझ्यावर रागावलीस होय ? आहे, माझ्य। चुकीची तू मळा क्षमा करशील ना! तू माझी प्रेमळ आई आंहेस---

ट्ट पहिला कावे

आईइं खरी द्या ही हृदयी भराने राही धू० ।।

हा देव आवडीचा

या सान बालकाचा ब्याकूळ जीव झाला

तो गोड बोल आला १॥

सुकुमार फूल हासे माया अमाल भास घरट्यांतल्या पिलाने हाकारिळे सखाने॥२॥

गावी नवी कहाणी

कांही म्हणात काणी आधार पक माता दावबील बाट आतां

( तिचा हात धरून तिला ओढीत. ) तुम्हा पुन्हा मागं वळून काय पह!- तेस! तूं येत नाहीस का?

हिरा--वचनानं मी तिकड॑ बांधळ॑ गेली आहे. त्यांच्या भेटीला मी आतांच कशी येऊं पग तुझे मन मोडणं माझ्या जिवावर येतं. तूं तर माझा प्राण आहेस. फुलांच्या पाकळ्यांत लतेला तिची गोड स्वप्नं दिसतात. चल बाळ, जिकर्ड वासरू तिकर्ड गाय !

( बहिरूच्या मागून जाते. )

८९ प्रवेश चवथा

पकबह्स्स ( विचारांत गुंग झालेला इंद्र प्रवेश करतो )

इंद्र --नारद मुनीच्या बोलण्याचा मला चमत्कार वाटतो. बरेच दिवसांनी त्यांची भेट झाली म्हणून मनाला आनंद वाटला, पण दुसऱ्या क्षणीं त्यांचे ते खोचक शब्द आठवून मन उदास होतं. प्रत्यक्ष भगवंतांनी अवतार घेण्याची पाळी यावी, असं पृथ्वीवरती कसलं अरिष्ट कोसळलं आहे? नारद खोटं बोठतील असं वाटत नाही. प्रभूंचे ते लाडके आहेत आगि त्यांची योग्यताहि तशीच मोठी आहे. आपल्या बरोबर येऊं नको, असं ते मला कां म्हणाले ? माझं विलासी वतन त्यांना आवडलं नाही, हे त्यांच्या उद्गारांवरून माझ्या ध्यानी आलं. पृथ्वीच्या संकटांत स्वगोनं तिला मदतीचा हात देणें, हें केव्हाहि योग्यच आहे. झाल्या च॒कीची दुरुस्ती वेळींच करण्यांत मोठेपणाबरोबर शहाणपणाहि दिसून येतो. नारदांना येथून जाऊन बराच वेळ झाला. ते मला नको म्हणाले तरी त्यांच्याबरोबर मी जायला हवं होतं. आतां अधिक वेळ गमावतां आपणही खालीं उतरून पृथ्वीचं दुःख समजून घ्याव. [ नारद प्रवेश करतो. ]

नारद---[ विस्मयपूवेक ] महेंद्रा ! असा एकटा कुठं निघालास-_तुझी यो अशी मठूल कां दिसते

इंद्र--मला भेटून तुम्ही येथून गेल्यापासून माझ्या मनाला बरं वाटेना मानवलोकांत ऊन तिथली सारी परिस्थिति समक्ष पाहून यावे, असं मी मनाशी ठरवल आणि पाय उचलला, तोंच तुम्ही पुन्हा मला भेटलांत--पृथ्वी वरची तुमची वारी सफळ झाली ना ! हवा असलेला माणूस तुम्हांला मिळाला का?

नारद--[ अभिमानाने ] होय ! तसा माणूस मला सापडला हें तुला सांगायला मला मोठा आनंद होतो. हाती घेतलेल्या कामांत इतक्या लवकर

९० पहिला कावि

यद मिळेल असं मला आधी वाटलं नव्हतं. कावळा बसायला अन्‌ डहाळी मोडायला एकच गांठ पडली.

4

इंद्र--तो कसा काय आहे---त्याचं नांव काय

नारद--त्याला वाल्या कोळी म्हणतात. अट्टल ठुटारूंचा राजा अन्‌ मुदोड मनाचा तो एक मागस आहे--नव्हे होता ! दुसर्‍यांना दःख देत आणि स्वताहि दुःखाचे घोट घेत तो कसातरी जगत होता. मला पाहतांच त्यान आपला विक्राळ पंजा माझ्यावर उगारला. चुकून वाघाच्या गुहेत शिरलेल्या हरिणाप्रमाणं माझी अवस्था झाली. माझ्या आयुष्याची दोरीच बळकट म्हणन मी वाचलो आणि त्यालाहि वाचविला !

--अशा आसुरी मानवाचा तुम्हांला उपयोग काय होगार ? पाठीला दोन पिसं चिकटवून डोमकावळ्याचा का मोर होतो ! सापाला हार समजून तुम्ही तो आपल्या गळ्यांत घालीत आहां. पहा बरं ! मोत्याच्या ऐवजीं नुसता शिंपलाच पदरांत पडेल, जातिवंत चोर कधी पहिला कवि होईल काय

नारद---तुला त्याची काळजी नको! मी सारी कळ फिरवून ठेवली आहे. त्याच्या वृत्तींत फिरून तसा पालट पडणार नाही !

इंद्र-ातुमची योजना अचूक असणार हें मी जाणून आहे. परंतु एकदा मनाला जडलेली संवय सहसा सुटत नाही. कितीहि माग वळविण्याचा अट्राहास कला तरी पाणी उतरतीकडंच धाव घेतं.

नारद---पण हें पाणी अगदी वेगळं आहे, आणि नियमाला अपवाद हा असतोच. आयुष्यांत असा एकादा प्रसंग येतो की, त्यानं काटयाचं फूल बनतं- विषाच अमृत होतं !

इंद्र-“पण त्या अमृताचे पुन्हा विष झालं तर--

नारद-_रवरी इच्छेचे पाठबळ असल्यावर तसा उलटा प्रकार होणार

अंकडेरा ९१.

नाही, याची मला पू खात्री आहे. अधोगतीचा तळ हा भावी उन्नतीचा कळस दाखवितो ! अपयशाच्या वाटेवरून यशाची पावलं उमटूं लागतात आगि कोंदाटलेल्या अंधारांतून प्रकाशाची हसरी मूर्ती प्रगट होते. निंद्य वाल्याचा वंद्य वाल्मिकी आगि जगाचा पहिला कवि व्हावा, असा इंइवरी सैकेत आहे. त्याची पूवेतयारी म्हणून मी त्याला तपाचं साधन सांगून ठेवळं आहे. देवी कृपेचं छत्र. त्याच्या मस्तकावर आहे.

ठुंद्र-“-( संशयी वरत्तीर्ने ) पण मनांत नसतां एकाद्याला मारून मुटकून संन्यासी बनविण्यांत हृशील काय गुळगुळीत दगडाला मुद्दाम पेल पा त्याचं रत्न होत नसतं

नारद---( सात्विक संतापाने ) तुला त॑ कळायचं नाही. कावीळ झालेल्या, रीग्याला सगळंच पिवळं दिसतं! डौलानं वर पहात डोलणाऱ्या माडाला पाया-- खालच्या हिरवळीचे कौतुक कस वाटेल परंतु फोफावणाऱ्या वादळाच्या लाटेने त्याचं तें मीपणानं ताठरलेलं मस्तक छिन्नविठिन्न होऊन खालीं झुकू लागतं आणि त्यानं तुच्छ मानलेली ती हिरवळच त्याला आपल्या कुशीचा आधार देते. कालचं चित्र आज पालटतं. सृष्टीचा तो सहजधमे आहे. अवघ्या विश्वाला गवसणी घालणारी विराट कालशक्ति, क्रांतीची पताका फडकावीत नव्या युगांचे ललकार घरीदारी धुमवीत राहिली आहे. मी मोठा, तो लहान” हें विषमतेचे पालुपद--मानवतेचं नवगीत नव्या सुरांनी आळवीत प्रगट होणाऱ्या समतेच्या देवतेला रुचेल काय बदलत्या जगाच्या स्वरांत आपला, सूर मिसळून उगवत्या उषेचे स्वागत करायला--जीवनाचा सजीव देव-- अनंत मुखांनीं सर्वांना सारखा पकारीत आहे. तिकडं लक्ष दे | सुवण किरणांनी कमलाचं हृदय प्रफुल्लित करणाऱ्या रमणीय अरुगाला पाहून वटवाघळाच। जीव कासावीस होतो, त्याला इलाज नाही. तुझी समुद्रा अशी पालटली का |! काय आहे तुझ्या मनांत

२२ पहिला कावे

(१८) राग तुला काँ आला, सखया आओळखुनी ती खूण जिवाची साघुनि घे खहिताला घू०

क्रांतीचा वाजे डका

दिपाबित नयनां दिव्य पताका

कायापालट करित जगाचा सूय नवा हा उगवला १॥

इंद्र--( नाखुषीनं ) तुमचा हेतु माझ्या लक्षांत आला. तथापि त्याची कसोटी पाहूनच तुमच्या म्हणण्याला मी मान डोलवीन.

नारद--जशी तुझी इच्छा ! ( जातो. )

इंद्र-ही माझ्याच परीक्षची वेळ आहे. यांतून कांहीतरी मागग काढला पाहिज. ( स्वताशीं विचार करीत ) चोराची परीक्षा घ्यायला चोरट्या सारखंच चागावे लागतं. काटधानंच काटा काढून टाकावा हेंच चांगलं, तर आतां असंच करावे ! कोण आहे रे तिकड ! ( प्रतिहारी येतो. )

प्रतिह्वारी--( प्रणाम करून ) आज्ञा महाराज !

इंद्र--असाच जा आणि त्या रंभेला इकडं पाठवून दे !

> ( प्रतिहारी जातो. रंभा प्रवेश करते. )

रंभा--( वंदन करीत ) महाराजांच्या सेवेला ही दासी सादर आहे.

इंद्र--एका खाजगी कामांत मल! तुझं साहाय्य हवं आहे.

रभा--काय ती आज्ञा व्हावी.

इंद्र--भूलोकावर वाल्या कोळी नांवाचा एक पुंड परमार्थाची पेठ लुट- ण्यास सरसावला आहे. त्याला तसं करू दिल्यानं भाविकांची दिशाभूल होइल

अंक रा ९३

आणि माझ्या पदरीं कमीपणा येईल. विषारी कळी उमलण्याच्या आंतच खुडून टाकावी. आपल्या मनोहर कलाविलासानं तूं त्याला मोहिनी घाठून त्याच्या तपरचर्येत विघ्न आण, आणि माझ्या हृदयांत शल्य दूर कर. तुझ्या गुणाचं चीज मी करीन.

रंभा><हं काम मी आनंदानं पत्करते. या दासीवर महाराजांची कृपादष्टि असावी ! (जाते. )

इंद्र--या सोनसळीच्या रुमझुम लहरीनं त्या चोराच्या मनाचं लोणी क्षणांत वितळून जाइल. नारद मुनींनीं त्याला आपल्या पाठीशीं घातल्यामुळ मला जरा संशय वाटतो. तथापि प्रयत्न तरी करून पहावा ! मासळीची चाहूल लागतांच बगळ्याची समाधी खाडकन उतरते. माझा होरा खरा ठरला तर ठौकच. नाहीतर वारा येईल तशी पाठ फिरवावी. [ जातो. ]

प्रवेश पांचवा

[ वाल्या कोळी वनांत तपश्‍चयो करीत आहे. राम राम असा मंद नाद त्याच्या मुखांतून निघत असतो. त्याचें सत्व पहायला इंद्राच्या आज्ञेवरून रंभा नाचत प्रवेश करत. ]

की

रंभा--बनि या बसंत आला छंद जिवाला संदर जडला धू० घत लकरी गाड कोकिळा प्रीति गुलाबी दावित लीला मधुर वचनीं मोहिनी हा दत संधेचा प्याला १॥

२४ पहिला कावि

'ह जोगी, डाळे उघडी तुजसाठी मी नले बडी आपण दोघे प्रेमरंग रमवू या हृदयाला ॥२॥

वाल्या--( हळू डोळे उघडून ) हे सुंदरी, तुझ्या दिव्य रूपानं आणि मधुर गीतानं कुगाचं मन प्रसन्न होणार नाही ! तुझ्या गुगाचं जितकं कौतुक करावं तितकं तें थोडं आहे. ( ती मुरकत त्याच्या नजीक जाते.) तुझ्या स्वर्गीय मोहिनीनं हें सारं वन कसं मंत्रमुग्ध होऊन डोलत आहे ! सोंदये हा या सृष्टीचा एक अनमोल अलंकार आहे. सुंदर वस्तु कुणाला आवडणार नाही ! खरोखर तूं फार सुंदर आहेस, पण तुझ्या या सुंदरपणांत विषाचा गुण असल्याचा माझ्या मनाला भास होतो. तुला माझ्याबद्दल आपलेपणा वाटतो, हें माझ सुदैव होय. पण आयंत्नुक स्नेह संशयास्पद असतो ! दिव्याची ज्योत लांवून मोहक दिसते. ( ती दूर सरते. ) तिच्या जवळ जाण्यांत पतंगाचे मरण असतं ! आपल्या दिमाखानं दुबळ्या पृथ्वीला हिणविण्यासाठीं स्वार्थी स्वगे हें मायावी स्वरूप धारण करून प्रगट झाला आहे. या दिखाऊ वेभवाच्य़ा लोभानं कसला लाभ होणार ! तूं सोंदयांची देवता आहेस. तुला माता समजून मी प्रणाम करतो. ( लज्जित होऊन रंभा निघून जाते. वाल्या पुन्हा ध्यानस्थ होतो. इंद्र येतो. )

इंद्र--हे देवी मानवा ! उठ, डोळे. उघड. तुझ्या निर्मळ वृत्तीनं आणि तपानं मी तुझ्यावर प्रसन्न झाला आहे

वाल्या-- हात जोडून) आपल्या दशेनानं मी आज धन्य झालों.

इंद्र--तुझं मन मी पाहिलं. तुझा भविष्यकाल उज्वल आहे. माझ्या परीक्षेत तूं उतरलास. तुझी काय इच्छा आहे

वाल्या--पथ्वीचं दुःख दूर होऊन सवे जीव सुखी असोत !

इंद्र--(त्याच्या मस्तकीं हात ठेवीत) तथास्तु ! नारद येतो )

अंकर रा ९"

नारद--( स्मित करीत ) देवेंद्रा ! पाहिलास कां हा माझा पहिला कवि ? याच्या शुद्ध झालेल्या वागीनं भगवताची नवी लीला जगाला ऐकायला मिळणार आहे.

--( ओशाळून ) मुनित्रष्ट ! आपण सर्वसमथ आहां. आपल्या अपूव पृण्याइनं आणि अजोड करणीने अंधकाराचा प्रकाश झाला--माझा संदेह मावळला ! ( निळू यतो. )

निळू--माझा पूर्वीचा पुढारी या नव्या स्वरूपांत मला पहावधीास मिळाला. हें माझं थोर भाग्य आहे. ( आईचा हात धरून बहिरू येतो. )

बहिरू--( आ«दित होऊन ) आई, ते पहा माझे' बाबा ! ( धावत जाऊन त्याला मिठी मारतो. वाल्या त्याला कुरवाळतो. हिरो त्याच्या जवळ जाते. काळू तारा येतात. )

वाल्या--( हिराकडे पहात) या सुखाच्या वेळीं तुमची मला भेट झाली. माझ हृदय आनंदानं भरून आल.

हिरा--' गद्िवरून ) आज माझ्या डोळ्यांचे पारणं फिटले !

वाल्या--प्रभरायाच्या कृपेने हा नवसाचा दिवस माझ्या जीवनांत उगवला.

९७ नारद--मानवजातीच्या मांगल्याची मुहूतंमेढ या छुभ घटकला रोविली जात आहे!

वाल्या--( पढें येऊन ) आपल्या पृण्यप्रभावाचं हे फळ आहे. माझ्या तोंडावरचा काळा बुरखा दूर होऊन माझ्या कतव्याचा मागे मल। दिसू लागला. जनता जनादनानं या गरिबाची सेवा गोड करून ध्यावी. आजपासून माझ्या नव्या तपरचर्येला प्रारंभ झाला--

पहिला कावे

[२०]

आनंदे रंगला डोळा, आला हा सोहळा नवा अन्तरींचा सखा भेटे, तुझे कोडं खुटे जिवा

वाजे मंजुळ ही वीणा, विद्ववाच्या मंदिरामधे जागा हा मानवा ! आतां, दिव्य वाणी पुन्हा वदे

जगाची साघितां सवा, सुखाचा मागे सापडे मंगल त्या प्रकाळयाचा, तजेला जीवना चढ

इंद्र--तुमचं आणि सववोर्च सदेव कल्याण असो ! नारद--<तथास्तु !

: बन्दमातरम्‌_

( पडदा पडतो. )

अकर रा समाप्त

पान ओळ अशुद्ध गुद

७्र १ड वाऱ्याच्या वेगानं वाऱ्याच्या वेगानं येऊन ट्ड १७ काया छाया

८८ ११५ तुम्हा तूं

८३ १३ व्या ओळीला जोडून वाल्याच्या तोंडीं पुढील वाक्य असारवे--- या निश्याचराच्या हीनपणांतून मला माणसांत आणा,

१७ व्या पानाच्या दोबटीं नारदाच्या तोंडीं हें पद असावें. नारद--फंक हा जडला ध्यास मला खुखदायक ती यादी जगतीं काव्यकला उदयाला धृ०॥ प्रेमभरे या प्रभुरायाची गाइल जो प्रियलळीला भेटेल कुठं तो कवितेचा मानकरी पहिला ॥१॥

३३ व्या पानांत दहाव्या ओळीनंतर-- नारद--पेक पुन्हा हा बोल खरा

सारुनि पडदा डोळ्यावरचा

सभोवार तूं पहा जरा धू० भावि सुखाची जाणुनि वाता माग धरी खहिताचा आतां बरी गमला अहंकार हा हीन दशेला नेत नरा॥